नाशिक

Nashik Crime News : सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; 11 लाखांचा ऐवज जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : गंगापूरसह सरकारवाडा, आडगाव, पंचवटी, म्हसरुळ, सातपूर आणि इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोनसाखळी ओरबडण्यासह विक्री आणि खरेदीदार सराफाच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या.

मुख्य संशयित रेकार्डवरील गुन्हेगार असून, या टोळीमुळे १३ सोनसाखळी खेचण्याच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. पोलिसांनी संशयितांकडून १० लाख ८० हजारांच्या सोन्यासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकीसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (gold chain thieves arrested by police nashik crime news)

सचिन साहेबराव पगार (३१, रा. संतोषीमातानगर, सातपूर), नीलेश कमलाकर शिरसाट (३०, रा. सार्थ नंदनवन अपार्टमेंट, अशोका कॉलेजजवळ, चांदशी), आकाश अनिल खैरनार (२४, रा. चांदशी), निरंजन साहेबराव पगार (३७, रा. संतोषीमातानगर, सातपूर), मुकूंदा दादा माने (५०, रा. चांदशी), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

गुन्ह्याचा तपास गंगापूर पोलिसांसह शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक व दोनची पथके करीत असताना घटना घडल्या तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात होते. त्यातून मुख्य संशयित सचिन पगार याचा शोध घेत त्यास अटक केली. चौकशीतून अनेकांची नावे समोर आली. संशयित सचिन सोने त्याचा भाऊ निरंजन यास द्यायचा.

निरंजन ते सोने सराफ माने याला विकायचा. तर सचिन याने नीलेश व आकाश याच्या संगतीने सोनसाखळी ओरबाडत असल्याची कबुली दिली. संशयितांकडून चोरीचे १८ तोळे सोन्याची लगड असा १० लाख ८० हजारांचा ऐवज व २५ हजारांची दुचाकी असा ११ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

यामध्ये गंगापूर हद्दीतील ५, सरकारवाडा व आडगाव हद्दीतील प्रत्येकी दोन तर, पंचवटी, म्हसरुळ, सातपूर आणि इंदिरानगर हद्दीतील प्रत्येकी १ असे १३ गुन्ह्यांची उकल झाली आहे. सदर कामगिरी गंगापूरचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, विजय ढमाळ, रणजित नलावडे यांच्या पथकाने बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT