Government funeral on Veer Jawan Kishor Shinde Nashik News
Government funeral on Veer Jawan Kishor Shinde Nashik News  esakal
नाशिक

'अमर रहे…'च्या घोषात जवान किशोर शिंदे यांना अखेरचा निरोप

माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : संपूर्ण जिल्ह्यात वीर जवानांचे गाव म्हणून ओळख असलेल्या नांदुर्डी गावचे भूमिपुत्र (Army Soldier) किशोर गंगाराम शिंदे (वय ३३) यांचे अमृतसर येथे अपघाती निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी येताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. त्यांच्या आई अनुसया शिंदे, वडील गंगाधर शिंदे यांच्यासह परिवार दुःखसागरात बुडून गेला. आज येथे किशोर शिंदे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात (Government Funeral) अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण तालुक्यासह नांदुर्डी गाव शोकसागरात बुडाले.

‘अमर रहे अमर रहे, किशोर शिंदे अमर रहे’च्या जयघोषाने नांदुर्डीनगरी दुमदुमुन गेली होती. फुलांनी सजविलेल्या रथयात्रेने किशोर शिंदेंची अंत्ययात्रा काढण्यात आली. अखेरचे दर्शन व निरोप देण्यासाठी जिल्ह्यासह तालुक्यातील महिला-बांधवांचा जनसागर उसळला होता. पत्नी काजल, दीड वर्षांची मुलगी वेदिका, वडील गंगाधर शिंदे, आई अनुसया शिंदे, लहान भाऊ संकेत शिंदे, बहीण यांना हुंदकाही फुटेना. किशोर हे घरातील मोठे असल्याने कुटुंबाचा आधारवडच कोसळला आहे.

किशोर शिंदे यांचे शिक्षण येथील जनता विद्यालयातच झाल्याने त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता. लहानपणापासूनच किशोर शिंदे यांना देशसेवा व देशभक्तीची ओढ असल्याने दहा वर्षांपूर्वी सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. सुरवातीचे काही वर्ष किशोर हे अमृतसर येथे सहकाऱ्यांसोबत राहात होते. चारच महिन्यांपूर्वी गावी येऊन पत्नी काजल व मुलगी वेदिका यांना आपल्यासोबत अमृतसर येथे ते घेऊन गेले होते.

प्रशासकीय यंत्रणा, ग्रामपालिका नांदुर्डी व किशोर शिंदेच्या संपूर्ण मित्रपरिवाराने त्यांच्या अंत्ययात्रेची तयारी करून काल सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडून किशोर शिंदेंना अखेरची सलामी देण्यात आली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, यतीन कदम, प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, जिल्हा माजी सैनिक कार्याध्यक्ष अरुण भंडारे, तालुकाध्यक्ष तुषार खरात, ग्रामस्थांतर्फे सरपंच, उपसरपंच व सदस्यांतर्फे किशोर शिंदेंच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. शोकमग्न वातावरणात मुलगी वेदिकाने पित्यास अग्निडाग दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT