Ramesh Bais Esakal
नाशिक

Nashik Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा

Nashik Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस येत्या शुक्रवारी (ता १२) नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. (Governor Ramesh Bais in Nashik on Friday news)

महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जितीन रहमान, उपवनसंरक्षक (पूर्व) उमेश वावरे, उपवनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्ग, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, तहसीलदार (महसूल) परमेश्वर कासुळे, दिंडोरी तहसीलदार पंकज पवार, येवला तहसीलदार शरद घोरपडे, त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्वेता संचेती आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, की नियोजित हेलिपॅड, शासकीय विश्रामगृह व दौरा याठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात यावी.

वाहतूक व्यवस्थेचेही सुयोग्य नियोजन करावे, त्याचप्रमाणे राज्यपालांच्या ताफ्यातील वाहनांची ‘आरटीओ’कडून तपासणी करून ती सुस्थितीत असल्याची खात्री करावी, शासकीय विश्रामगृह, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या ठिकाणी राज्यपालांची भेट प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणीही सुरक्षा व इतर बाबींच्या व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

योजनांचा आढावा

जिल्हाधिकारी म्हणाले, की राज्यपालांना पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, हर घर जल योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, प्रधानमंत्री किसान योजना, कृषी योजना, शाळा इमारत, डीबीटी प्रदान लाभ योजना त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आश्रमशाळा, अंगणवाडी यांचा आढावा घेणार असल्याने संबंधित विभागांनी माहिती सादर करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT