Governor Ramesh Bais statement Malnutrition in tribal taluk is matter of concern nashik news esakal
नाशिक

Governor Ramesh Bais: आदिवासी तालुक्यांतील कुपोषण हा चितेंचा विषय : राज्यपाल रमेश बैस

सकाळ वृत्तसेवा

Governor Ramesh Bais : मुंबई आणि पुण्यासह नाशिकचा ‘सुवर्ण त्रिकोणा’त समावेश झाला आहे. जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांत विकासाच्या मोठ्या संधी आहेत. आदिवासी तालुक्यांतील कुपोषण हा सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे.

नाशिकच्या आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी उपाययोजना करून पुढील पाच वर्षांत जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस कृती कार्यक्रम हाती घ्यावेत, अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली. (Governor Ramesh Bais statement Malnutrition in tribal taluk is matter of concern nashik news)

मोडाळे (ता. इगतपुरी) येथे मंगळवारी (ता. २१) विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित महाशिबिर कार्यक्रमाचे उद्‍घाटन राज्यपाल बैस यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की आदिवासी विभाग माझ्याच अखत्यारित आहे.

त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचण्याची माझी मनापासून इच्छा होती. या कार्यक्रमानिमित्त तुमच्याशी संवाद साधता आला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी अमूल्य योगदान दिले आहे; परंतु त्यांचा इतिहास मागच्या पानांत दडविला गेला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आदिवासींच्या जीवनात परिवर्तन आणणे हा केंद्र सरकारचा उद्देश असून, शेवटच्या घटकांना योजनांचा लाभ मिळेल, याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी. देशात २६ जानेवारी २०२४ पर्यंत विकसित भारत अभियान राबविण्यात येणार असून, आदिवासी बांधवांना शिक्षित व सशक्त करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.

लोकांना केवळ आत्मनिर्भर बनवायचे नाही, तर त्यांच्या भागाचा विकास करण्यासाठी सामूहिक योगदान देण्याइतपत त्यांना सक्षम बनवायचे आहे. वंचित घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी सरकार तुमच्या दारापर्यंत येत आहे. विकसित भारत यात्रेत लोकसहभाग वाढला तरच ही यात्रा यशस्वी होईल, असे श्री. बैस यांनी सांगितले. शासनाने आदिवासी भागात ‘सिकल सेल अॅनिमिया’ निर्मूलन मोहीम सुरू केली आहे.

एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये नावनोंदणी, शिष्यवृत्ती योजना, वनहक्क मालकी, वैयक्तिक आणि सामुदायिक जमीन, वनधन विकास केंद्र, आदिवासी भागातील विशिष्ट समस्यांकडेही लक्ष दिले जात असल्याचे श्री. बैस यांनी सांगितले. कार्यक्रमास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री दादा भुसे, आमदार हिरामण खोसकर, राधाकृष्ण गमे, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी जलज शर्मा, विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांतील लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT