Gram Panchayat election is being campaigned on social media nashik marathi news 
नाशिक

सोशल मिडीयावर ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा! जागोजागी गावकीच्या अन् भावकीच्या लढाईचे चित्र 

माणिक देसाई

निफाड (जि.नाशिक) : तालुक्यात होऊ घातलेल्या ६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा निवडणुकीत आता खऱ्या अर्थाने रंग भरायला सुरवात झाली आहे. गावकीच्या अन् भावकीच्या लढाईचे चित्र तालुक्यातील समाज माध्यमावर झळकायला सुरवात झाल्याने गावाकडील ग्रुपवर ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा सर्वांना अनुभवास मिळत आहे. 

समर्थक प्रचारासाठी जुंपले

ग्रामपंचायत निवडणुकीची जोरात तयारी सर्वच तालुक्यांमध्ये सुरू झाली असून, अनेकांनी आता आपापल्या परीने गाठीभेट घेत प्रचारात छुपी सुरवात केली आहे. सोशल मीडियावरही जोरदार प्रचार सुरू असून, इच्छुकांचे समर्थक प्रचारासाठी जुंपले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी गावकीच्या अन् भावकीच्या लढाईचे चित्र दिसत असून, याची चर्चाही गावाच्या कट्ट्यावर होत आहे. हे सर्व सुरू असतानाच यातच जो उमेदवार १९९५ नंतर जन्मलेला असेल आणि ज्याला सरपंच म्हणून नियुक्त करायचे असेल तर संबंधित उमेदवार सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचा शासन निर्णय निघाल्याने काही अंशी अशा उमेदवारांचे नुकसान होणार आहे. 


उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी 

अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांच्या हातात आता तीनच दिवस शिल्लक राहिले असल्याने इच्छुकांना टेन्शन आले आहे. सोमवारीच (ता. २८) अर्ज भरण्यासाठी नक्कीच गर्दी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अत्यंत कमी वेळ असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, झेरॉक्स करणे, अनामत रकमेची जमावजमव करणे आदी गोष्टींसाठी या इच्छुकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातच ऑनलाइन अर्ज भरताना राज्यात अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत. तांत्रिक कारणामुळे उमेदवारी अर्ज भरताना वेळ लागत आहे. यामुळे आता केंद्रावर अर्ज भरण्यासाठी गर्दी उसळणार आहे. पुढच्या तीन दिवसांत अर्ज भरण्याची तारेवरची कसरत या इच्छुकांना करावी लागणार.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

B.Ed student suicide attempt: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Latest Marathi News Updates : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT