aswali corona 123.jpg
aswali corona 123.jpg 
नाशिक

भयंकर! रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असूनही त्यांनी लपविले...माहिती समजली अन् गावात प्रचंड खळबळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / अस्वली स्टेशन : १४मे रोजी रुग्णाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याच रुग्णावर भायखळा येथील भारतीय रेल्वेच्या दवाखान्यात हृदयरोगावर रुग्णावर डायलिसिस पध्दतीने उपचार सुरु होते. मात्र सध्या कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर तेथील उपचार पध्दतीमुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी रविवारी सायंकाळी नाशिकच्या राहत्या घरी बेलगाव कुऱ्हे येथे आणण्यात आले. पण त्यानंतर जे काही घडले ते धक्कादायक होते.

असा घडला प्रकार

भायखळा येथील भारतीय रेल्वेच्या दवाखान्यात हृदयरोगावर रुग्णावर डायलिसिस पध्दतीने उपचार सुरु होते. मात्र सध्या कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर तेथील उपचार पध्दतीमुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी रविवारी सायंकाळी नाशिकच्या राहत्या घरी बेलगाव कुऱ्हे येथे आणण्यात आले. त्यानंतर त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. धक्कादायक बाब म्हणजे ही माहिती प्रशासनाकडून माहिती लपविल्याबद्दल ग्रामपंचायतीकडून संबंधिताविरोधात वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. त्या पाठोपाठ (ता.२५) इगतपुरीच्या पूर्व भागातील बेलगाव कुऱ्हे येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे.

आरोग्य पथक घेवून कोरोना बाधित रुग्णाच्या घरी

सदर बाब समजताच बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रास कोरोना बाधित अहवाल सादर करण्यात आला असता येथील वैद्यकीय अधिकारी जी.पी.बांबळे हे तात्काळ आरोग्य पथक घेवून कोरोना बाधित रुग्णाच्या घरी दाखल झाले. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांना तात्काळ  क्वारंटाईन करण्यात आले असून नातेवाईक आणि रुग्णास तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गावातील अठ्ठेचाळीस संशयीत क्वारंटाईन.

गावात १८८ कलम लागू करण्यात आला असून प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. तसेच कोरोना बाधित रुग्ण गावात आढळून आल्याने गावात तणावपूर्ण वातावरण आहे. तसेच गावातील अठ्ठेचाळीस संशयीत क्वारंटाईन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने प्रभावी उपाय योजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच नंदराज गुळवे यांनी सकाळशी बोलतांना दिली आहे.

" मुंबईत कोरंटाईन असतांना विनापरवानगी गावात येणे,कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती प्रशासनापासून लपविल्याबद्दल ग्रामपंचायतीने सबंधित दोषी व्यक्तीवर वाडीवऱ्हे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. आगामी काळात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी पणे राबविण्यात येणार आहे.-किरण आहिरे,ग्रामविकास अधिकारी, बेलगाव कुऱ्हे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT