shiv jayanti esakal
नाशिक

Shiv Jayanti 2023 : शिवप्रेमींना पाहायला मिळणार भव्य आरमार!

योगेश मोरे

पंचवटी (जि. नाशिक) : छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांनी समुद्रात देखील मराठ्यांचे साम्राज्य उभे करण्यासाठी बोट बांधणीचा कारखाना देखील काढला होता.

त्याकाळी भिवंडी जवळ स्वराज्याचे आरमार उभारले जात होते. (grand replica of armor is being made on occasion of Shivaji Maharaj birth anniversary nashik news)

शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्ताने हिरावाडीतील कमल नगर चौक येथे या आरमारची भव्य प्रतिकृती साकारली जात आहे.

याठिकाणी साकारलेल्या होडीत अंतर्गत शस्त्रागार देखील शिवप्रेमींना पाहायला मिळणार असून, शहरातील सर्व शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांना शिवजयंती नंतर पाच ते सहा दिवस येथील आरमार देखावा बघायला मिळणार असल्याचे स्वागताध्यक्ष दिगंबर मोगरे यांनी सांगितले.

अवघ्या महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत मानले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव रविवारी (ता.१९) सर्वत्र साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने पंचवटीतील हिरावाडी येथे गेल्या दोन वर्षांपासून पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रेरणेने, माजी नगरसेवक अजय बोरस्ते व पूनम मोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजन्मोत्सव यात्रेचे आयोजन केले जात आहे.

यंदाच्या देखाव्याचे विशेष महत्त्व म्हणजे, राज्य सरकार भिवंडी येथे या आरमारचे संग्रहालय साकारणार आहे. हे संग्रहालय उभारण्याआधी या आरमाराचा देखावा नाशिककरांना पाहायलाउ मिळणार आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

भिवंडी येथील दुर्गाडी किल्ला परिसरात १६५७ साली स्वराज्याचे प्रथम आरमार उभारले. याठिकाणी सागवान जातीचे झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने, शिवाजी महाराजांनी जहाज बांधणीसाठी या किल्ल्याची निवड केली होती. हा सर्व इतिहास आजच्या पिढीला समजावा या हेतूने हा देखावा राजा (भैय्या) पिरजाडे यांच्या संकल्पनेतून याठिकाणी साकारला जात असल्याचे दिगंबर मोगरे यांनी सांगितले.

या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमींना हा देखावा पायी फिरून जवळून बाघायला मिळणार आहे. प्रथम तुळजाभवानी मातेचे मंदिर त्यानंतर जहाजावर जाता येणार आहे.

येथून जहाजाच्या तळमजल्यावर उतरूनई अंतर्गत शस्त्रागार अर्थात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. याठिकाणी संबंधित इतिहासाची सविस्तर लिखित माहिती प्रदर्शित केली जाणार असल्याचे यावेळी दिगंबर मोगरे यांनी सांगितले.

शनिवारी भगवान शंकराची वरात

शनिवारी (ता.१८) महाशिवरात्री निमित्त याठिकाणी भगवान शंकर यांची लग्न वरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात नंदी व त्याचे भूत-पिशाच्च गण यांचा जिवंतपणा यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. यासह भगवान शंकराची बर्फाची शिवपिंड साकारली जाणार आहे.

सहा दिवस आरमार देखावा बघता येणार

पारंपारिक किल्ला देखावा व शिवजयंती साजरी न करता आगळा वेगळा देखावा याठिकाणी साकारण्यात येत आहे. हा देखावा उभारणीचे काम मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे.

भिवंडी येथील ५० कारागीर यासाठी मेहनत घेत आहेत. हा देखावा शिवजयंती नंतरचे पाच ते सहा दिवस सर्व शिवप्रेमींना पाहायला मिळणार आहे. यासाठी शहरातील सर्व शाळा व महाविद्यालये यांना मंडळाच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती दिगंबर मोगरे यांनी दिली.

शिवजन्मोत्सव निमित्त यात्रा

आरमार देखावा यासह याठिकाणी १४ फूट उंच अश्वारूढ शिवाजी महाराज यांचा पुतळा याठिकाणी उभारण्यात येणार आहे. येथील स्व. दत्ताजी मोगरे क्रीडा संकुलात यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, अबाल-वृद्धांना आनंद घेता यावा यासाठी विविध प्रकारच्या खेळणी,

आकाश पाळणा, खाऊ गल्ली यासह अन्य स्टॉल उभारण्यात येणार आहे. शिवजयंतीच्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजता महाआरती करण्यात येणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व तुळजाभवानी मातेचा जिवंत देखावा पाहायला मिळणार असल्याचे दिगंबर मोगरे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT