A grand theater built at Hirawadi. esakal
नाशिक

Nashik News: हिरावाडी येथे साकारणारे भव्य नाट्यगृह पूर्णत्वाच्या मार्गावर; कलाप्रेमींना अनोखी भेट

योगेश मोरे

पंचवटी (जि. नाशिक) : हिरावाडी येथे माजी नगराध्यक्ष (कै.) सदाभाऊ भोरे यांच्या नावाने शास्त्रीय पद्धतीने सुमारे साडेसहाशे आसनव्यवस्था असलेले भव्य नाट्यगृह नवीन वर्षात खुले होणार असल्याने नाशिक व पंचवटीतील कलाप्रेमींना अनोखी भेट मिळणार आहे. भव्यदिव्य सर्व सोयींनी युक्त असे नाट्यगृह पूर्णत्वाच्या मार्गावर असून जानेवारीत सर्वांसाठी खुले होणार असल्याची माहिती माजी नगरसेविका प्रियांका माने यांनी दिली. (grand theater to be built at Hirawadi nears completion unique gift for art lovers Nashik Latest Marathi News)

नाशिकमध्ये महाकवी कालिदास कलामंदिर व परशुराम साईखेडकर नाट्यगृह या व्यतिरिक्त मोठे नाट्यगृह नसल्याने अनेक कलाप्रेमींना कसरत करावी लागत होती. पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृह लोकसंख्येच्या मानाने अतिशय कमी क्षमेतेचे असल्याने पंचवटीतील सांस्कृतिक कार्यक्रम व शाळा महाविद्यालयातील विविध उपक्रमांना खूपच अडचण निर्माण होत होती, आता मात्र काही सदाभाऊ गंगाराम भोरे यांच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या म्हणजेच लवकरच लोकार्पण होणाऱ्या नाट्यगृहामुळे कलाप्रेमींबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या कलाप्रेमींची व शाळा महाविद्यालयांची अडचण बऱ्यापैकी दूर होणार आहे.

नाट्यकर्मी, रंगकर्मी, कलाप्रेमींनी वेळोवेळी साकारल्या जाणाऱ्या नाट्यगृहाला भेट देऊन आनंद व्यक्त केला असल्याचे धनंजय माने यांनी सांगितले. सुमारे दीड एकरात नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली असून, उर्वरित जागा वाहनतळासाठी खुली राहणार आहे. वाहनतळ भव्य असून मुख्य प्रवेशद्वारापासून नाट्यगृहापर्यंत काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

असे असेल नाट्यगृह

संपूर्ण नाट्यगृहासाठी २३ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. नाट्यगृहात २ हजार चौरस मीटरचा भव्य रंगमंच उभारला आहे. नाट्यगृहात सहाशे पन्नास आसनक्षमता असून गॅलरी १५० तर खाली मूळ सभागृहात पाचशे प्रेक्षक बसू शकतील एवढी आसनव्यवस्था आहे. कलावंतांच्या सूचनेनुसार बनवण्यात आल्याने येथे चांगली व्यावसायिक नाटकेदेखील होऊ शकतात. नाट्यगृहात येणाऱ्या कलावंतांना थेट मागील बाजूने मोटार नेऊन नाटकाची प्रॉपर्टी तसेच अन्य साहित्य नेता येईल अशी व्यवस्था केली आहे.

दोन प्रॅक्टिस हॉल

कलाकारांना प्रॅक्टिससाठी मुख्य रंगमंचऐवजी दोन प्रॅक्टिस हॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुख्य सभागृहात प्रेक्षकांना ये -जा करण्यासाठी सहा दरवाजे बसवण्यात आले असून एक मुख्य दरवाजा भव्य व आकर्षक बसविला आहे. मुख्य सभागृहातील व गॅलरीतली प्रेक्षकांना स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्थादेखील केली आहे. प्रत्येक पडद्याला स्वतंत्र मोटार बसविण्यात आली असल्याने व पूर्णता वातानुकूलित असे अत्यंत आकर्षक नाट्यगृह साकारले आहे. सध्या या नाट्यगृहाची अंतिम कामे सुरू असून जानेवारी महिन्यात लोकार्पण होणार असल्याचेही सूतोवाच माजी नगरसेविका प्रियांका माने व धनंजय माने यांनी दिले.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

नाट्यगृहात विशेष

* ६५० प्रेक्षकांची आसनव्यवस्था
*२ हजार चौरस मीटर चे भव्य स्टेज
* २ प्रॅक्टिस हॉल
* स्वतंत्र कॅन्टीन व्यवस्था
* साडेचार एकर जमिनीवर वाहनतळ
* आकर्षक विद्युत रोषणाई
* अत्याधुनिक साउंड सिस्टिम

"पंचवटीकरांसह नाशिकमध्ये कलाप्रेमी व सर्व नागरिकांना नाटकांसह विविध कार्यक्रमांचा आस्वाद घ्याता यावा, यासाठी महापालिकेकडे व प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून सहा एकर जागेवर दीड एकरात भव्यदिव्य सर्व सोयींनी युक्त नाट्यगृह पंचवटीतील हिरावाडीत साकारण्यात आले आहे. या नाट्यगृहाचा सांस्कृतिक, सामाजिक संघटनांसह विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गुणदर्शन आणि इतर कार्यक्रम सादर करण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे." - प्रियांका माने, माजी नगरसेविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT