grapes.jpg 
नाशिक

नाशिक जिल्ह्यातून द्राक्षाचा कंटेनर जर्मनीला रवाना; नव्या जोमाने हंगामासाठीची तयारी सुरू

अरुण खंगाळ

लासलगाव (जि.नाशिक) : द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेश झाला असून, पहिला द्राक्षाचा १२.४८० टनांचा कंटेनर जर्मनीला रवाना झाला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षी शेतकऱ्यांमध्ये आलेली मरगळ दूर करून आता नव्या जोमाने हंगामासाठीची तयारी सुरू झालेली आहे.

नव्या जोमाने हंगामासाठीची तयारी सुरू

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कोरोना, हवामान, बाजारपेठ, निर्यात असे अनेक प्रश्‍न घेऊन आर्थिक परस्थितीतही पुन्हा एकदा नव्या जोमाने लढण्यासाठी सज्ज आहेत. द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. केवळ द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असून,विक्रीच्या दृष्टीने नवीन बाजारपेठ, नवीन ग्राहक मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारतीय कृषिमालाला बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याकरिता केंद्र सरकारने बांगलादेशमध्ये द्राक्ष निर्यातीसाठी विशेष लक्ष देऊन वाहतूक खर्च आणि ड्यूटी कमी केली पाहिजे. केंद्र सरकारने बांगलादेशची राजधानी ढाका येथे द्राक्ष निर्यातीसाठी रेल्वे उपलब्ध करून दिल्यास देशातील मोठ्या प्रमाणात द्राक्षे बांगलादेशमध्ये निर्यात होऊन देशाला चांगले परकीय चलन मिळू शकते याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी व्यक्त केले. \


निर्यातीसाठी ४५ हजार प्लॉट द्राक्षबागांची नोंद... 
पोषक हवामानामुळे यंदा निर्यातक्षम, दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन वाढणार आहे. जानेवारीपासून द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. या वेळी ४५ हजारांहून अधिक उत्पादकांनी निर्यातीसाठी नोंदणी केलेली आहे. 

भारतीय द्राक्षांची चिलीशी स्पर्धा... 
निर्यातक्षेत्रात भारतीय द्राक्षांची अनेक वर्षांच्या मोनोपॉलीला मागील काही वर्षांपासून चिली या देशाने आव्हान दिले आहे. मागील वर्षी चिलीच्या द्राक्षांनी चांगलाच भाव खाल्ला होता. त्याचा परिणाम भारतीय द्राक्षांच्या निर्यातीवर झाला होता. चिलीत द्राक्षाच्या ३० ते ३५ व्हरायटी आहेत. 

केंद्र सरकारने बांगलादेशमध्ये द्राक्ष निर्यातीसाठी विशेष लक्ष देऊन वाहतूक खर्च आणि ड्यूटी कमी केली पाहिजे. बांगलादेशातील ढाकाकरिता द्राक्ष निर्यातीसाठी रेल्वे उपलब्ध करून दिल्यास देशातील मोठ्या प्रमाणात द्राक्षे बांगलादेशमध्ये निर्यात केली जातील आणि देशाला चांगले परकीय चलन मिळू शकेल. -कैलास भोसले, अध्यक्ष, द्राक्षबागायदार संघ  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT