Grape growers are worried due to unseasonal rains in Kasbe Sukene area 
नाशिक

कसबे सुकेणे परिसरात बेमोसमी पाऊस; द्राक्ष उत्पादक चिंतेत 

भरत मोगल

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : गेल्या चार दिवसांपासून सतत ढगाळ हवामान व त्यातच सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कसबे सुकेणे व परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिसरात जवळपास अर्धा तास (ता. ४) जोरदार पाऊस झाला. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. 

आठ दिवसांमध्ये अनेक द्राक्षबागा सुरू होणार

पंधरा दिवसांपूर्वीदेखील अशाच प्रकारे सतत ढगाळ वातावरण होते. सकाळी दाट धुके व बेमोसमी पाऊस यामुळे अनेक द्राक्षबागांना तडे गेले होते. त्यातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची हानी झाली होती. या संकटातून शेतकरी सावरतोय तोच पुन्हा बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. चालू स्थितीमध्ये अनेक द्राक्षबागा विक्रीसाठी तयार झाल्या आहेत. जम्बो, नानासाहेब पर्पल, शरद सीडलेस, फ्लेम आदी प्रकारची द्राक्षे सध्या कसबे सुकेणे परिसरात मोठ्या प्रमाणात तयार झाली आहेत. येत्या आठ दिवसांमध्ये अनेक द्राक्षबागा सुरू होणार आहेत. मात्र, त्यातच आता पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

वातावरणात बदलांमुळे चिंतेत भर

हवामान खात्यानेही सात ते आठ तारखेपर्यंत वातावरणात सतत बदल होत राहतील, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्टेजमधील द्राक्षबागांसाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार असल्याने उत्पादन खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT