Nashik : Marriage Registration Office in East Divisional Office esakal
नाशिक

Nashik News : विवाह नोंदणीसाठी आलेख वाढताच

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : विविध कामांच्या पुराव्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे दिवसेंदिवस विवाह नोंदणी उदासीन असलेल्या नागरिकांचा आता नोंदणीसाठी कल वाढला आहे. महापालिका पूर्व विभागीय कार्यालयाचा विचार केला तर २०२१ मध्ये वर्षभरात २५७ तर २०२२ मध्ये २४ नोव्हेंबरपर्यंत सुमारे ३१५ विवाह नोंदणी झाली आहे.

विवाह झाल्यानंतर मुलीचे आधार कार्डवरील माहेरचे नाव बदलून सासरकडील नाव लावण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची मागणी केली जाते. त्याचप्रमाणे शैक्षणिक कामात तसेच, शाळा महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध कामांसाठी आई-वडिलांच्या विवाह नोंदणीचे प्रमाणपत्राची आवश्यकता असते.(Graph for marriage registration increases Awareness of citizens this year has increased by 58 compared to last year Nashik News)

त्याचप्रमाणे पासपोर्टसाठी देखील बहुतांशी वेळा विवाह नोंदणी प्रमाणपत्र मागितले जाते. इतकेच नाही तर काही कारणास्तव वैवाहिक संबंध तुटल्यास घटस्फोटासाठी वकिलांकडून पुरावा म्हणून त्यांच्या विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मागितले जाते.

अशा विविध कामांसाठी विवाह होताच विवाह नोंदणी केली जाते. महापालिका पूर्व विभागीय कार्यालयाचा विचार केला तर २०२१ मध्ये वर्षभरात २५७ तर २०२२ मध्ये २४ नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुमारे ३१५ विवाह नोंदणी झाली आहे. अर्थात २०२२ च्या २४ नोव्हेंबरपर्यंतच ५८ ने विवाह नोंदणी वाढली आहे. पुढील डिसेंबर महिन्यात यात आणखी भर पडणार आहे.

मे महिन्यातील तफावत

विवाह नोंदणी संदर्भात दोन्ही वर्षाच्या मे महिन्यातील तफावतचा आकडा लक्षात घेतला तर २०२१ मधील मे महिन्यात केवळ २ विवाह नोंदणी झाल्या. त्यावर कोरोनाचा काही प्रमाणात प्रभाव होता. असे असले तरी २०२२ च्या मे महिन्यात तब्बल २७ विवाह नोंदणी झाल्या आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

विवाह नोंदणीतील दोन वर्षांतील तफावत

२०२१ २०२२

महिना विवाह नोंदणी महिना विवाह नोंदणी

जानेवारी ३० जानेवारी २७

फेब्रुवारी ३७ फेब्रुवारी ४२

मार्च ३१ मार्च २६

एप्रिल १४ एप्रिल २७

मे ०२ मे २७

जून २२ जून ४२

जुलै २४ जुलै ३२

ऑगस्ट १७ ऑगस्ट २४

सप्टेंबर २७ सप्टेंबर १८

ऑक्टोबर २१ ऑक्टोबर १८

नोव्हेंबर १४ २५ नोव्हेंबरपर्यंत ३५

डिसेंबर १८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT