growing number of corona patients in Malegaon is alarming nashik marathi news 
नाशिक

मालेगावात कोरोनाचे भय संपेना! वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील कोरोना हद्दपार करण्याकडे वाटचाल सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरू पाहत आहे. सध्या शहरात १५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याने सध्या वीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

शहरात कोरोनाने पहिल्या टप्प्यात थैमान घातले होते. विशेषत: येथील मुस्लिम बहुल पूर्व भागात रुग्णसंख्या सर्वाधिक होती. एप्रिल ते जून या काळात पहिल्या टप्प्यातील कोरोना रुग्ण आढळले. त्यानंतर पूर्व भागातून कोरोना जवळपास हद्दपार झाला. जुलैपासून शहरातील कॅम्प, संगमेश्‍वरच्या पश्‍चिम भागाला कोरोनाने विळखा घातला. सहा महिने झाले तरी हा विळखा कायम आहे. महापालिका हद्दीत सध्या १५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या महिन्यात ही संख्या ७० पर्यंत खाली आली होती. पंधरा दिवसांपासून रुग्ण वाढत आहेत. महापालिकाहद्दीत आतापर्यंत चार हजार ५१८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यात चार हजार १९४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले. यातील १७४ जणांचा मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८३ टक्के आहे. अद्याप १५३ अहवाल प्रलंबित आहेत. 

नियमांची ऐशीतैसी 

कोरोना संदर्भात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची येथे सर्रास पायमल्ली केली जात आहे. शहरात केवळ दहा टक्के नागरिक मास्क वापरतात. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. शहर व ग्रामीण भागात लग्नसोहळ्यांची धूम आहे. कोरोना हद्दपार झाला, अशा अविर्भावात नागरिक वावरत आहेत. महसूल व पोलिस प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या २० पर्यंत खाली आली आहे. सध्या होणारे लग्नसोहळे व आगामी ग्रामपंचायत निवडणूक पाहता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा कोरोनाचा फैलाव वाढू शकेल, अशी भीती व्यक्त होत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT