Dada Bhuse Latest Marathi News
Dada Bhuse Latest Marathi News esakal
नाशिक

Nashik : पालकमंत्री दादा भुसे यांची Dinner Diplomacy

विनोद बेदरकर

नाशिक : माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सारख्या दिग्गज नेत्यानंतर पालकमंत्रीपद सांभाळताना दादा भुसे कामकाजावर अल्पवधीतच पकड मिळवीत आहेत. घरून डबा आणून शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बसून आपुलकीने जेवणाची श्री भुसे यांची डिनर डिप्लोमसी चर्चेचा विषय आहे. (Guardian minister dada bhuse Enjoy home cooked meals in Nashik DIstrict Collector Hall Nashik News)

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद ही तारेवरची कसरत असते. १५ तालुक्यांचा आदिवासी, ग्रामीण, शहरी नीम शहरी तसेच दुष्काळी पावसाळी अशा संमिश्र स्वरूपाच्या लोकवस्तीच्या कार्यक्षेत्राच्या अंगाने व्यापक जिल्ह्यात राजकारण, समाजकारण आणि जिल्ह्याचे प्रश्नही भिन्न भिन्न आहे. अशातच राज्यातील सत्ताधारी भाजप पक्षाचे संकटमोचक म्हणविणाऱ्या गिरीश महाजन आणि राज्यातील दिग्गज म्हणून लौकिक असलेल्या छगन भुजबळ अशा दोन दिग्गजांनी नेतृत्व केलेल्या जिल्ह्यावर कमांड मिळविताना भुसे यांचा कस लागण्याची चिन्हे होती. मात्र भुसे डिनर डिल्पोमसीसारख्या प्रयोगातून थेट अधिकारी आणि सामान्यांशी संपर्क वाढवत आहेत.

मालेगाव आणि कसमादेसोबत सगळ्या जिल्ह्यातील कामावर कमांड मिळविताना भुसे यांनी अल्पावधीतच प्रशासनाशी सूत जुळविले आहे. एका बाजूला चारही बाजूच्या भागातील नागरिकांच्या अपेक्षा, दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीवर वाढत असलेला जिल्ह्यातील ठेकेदारांचा राबता या सगळ्यांत जिल्हा बँकेतील ठेवीदारापासून तर सामान्य नागरिकांना वेळ देत त्यांचे प्रश्न मार्गी लावताना भुसे यांनी नाशिकचा दौरा वाढविला आहे.

याच दरम्यान कामावरील स्थगिती उठविण्याच्या नावाखाली जि.प. परिषदेच्या ठेकेदारांनी डीपीडीसीला गराडा घातला आहे. हा गराडा शक्य तेवढे दूर ठेवताना त्यांनी थेट प्रशासनासोबत नियमित बैठकांतून कामाचा उरक वाढविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी चक्क अधिकाऱ्यांच्या दालनात घरून आणलेला डबा सोडून ते अधिकाऱ्यांसोबत जेवण घेतात. थेट कार्यालयात सर्वासोबत मिसळून कामकाज करताना स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्नशील ठेकेदारांची मात्र चांगलीच गोची झाली आहे.

येणाऱ्यांना सन्मान

श्री भुसे यांनी सकाळी साडेनऊपासून बैठक होत्या. दुपारनंतर महापालिकेत बैठक असल्याने मधल्या वेळेत जेवणासाठी त्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात घरचे भोजन घेतले. हे करताना त्यांना भेटायला अनेक जण सुरूच होते. बांधकाम विभागातील प्रश्नासोबत एक शिष्टमंडळ आले.

त्यांच्याशी संवाद साधताना भुसे यांनी त्यांनाही स्वतःच्या डब्यात जेवणासाठी आमंत्रित केले. एकूणच अधिकाऱ्यापासून तर तक्रारदारांपर्यत थेट आपुलकीच्या नात्याने स्वतः:च्या घरून आणलेल्या भोजनात सहभागी करून घेत, भुसे यांनी सुरू केलेल्या डिनर डिप्लोमसी प्रशासनात त्यांच्याविषयी सहानुभूती वाढविण्यात यशस्वी ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT