Gurumauli Annasaheb More while guiding the weekly satsang ceremony at Pradhan Kendra. esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : ज्ञानाची पाणपोई सर्वांपर्यंत पोहोचवा : गुरुमाउली अण्णासाहेब मोरे

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : दिंडोरी प्रणीत सेवामार्ग म्हणजे ज्ञानाची पाणपोई असून, ही ज्ञानाची पाणपोई सर्वांपर्यंत पोहोचवून अज्ञानीजनाला ज्ञानी आणि सुखी करा, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी येथे आज केले.

दिंडोरी प्रधान केंद्रात आज साप्ताहिक प्रश्नोत्तरे-मार्गदर्शन आणि सत्संग समारोह पार पडला. कामिका एकादशीनिमित्त पादुका पूजन आणि गुरुपद सोहळाही आयोजित करण्यात आला होता. (Gurumauli Annasaheb More guidance about make more people know about Dindori Pranit Seva Marg nashik news)

राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना गुरुमाउलींनी संबोधित केले. गुरुमाउली म्हणाले, की वर्षभरातील २४ एकादशा या भगवान विष्णूच्या मानस कन्या आहेत.

आज ‘कामिका एकादशी’ आहे. प्रत्येक एकादशीचे माहात्म्य निराळे आहे. मागील देवशयनी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत आपण गुरुपौर्णिमा महोत्सव देश-विदेशातील सर्व केंद्रांमध्ये साजरा केला. प्रति एकादशीला भगवान विष्णूंच्या ‘श्री वत्सं धारयन-वक्षे मुक्ता माला षडाक्षरम्’ या दिव्य मंत्राचा जप करावा आणि ‘दिंडोरी प्रणीत सेवामार्ग’ या यूट्यूब चॅनलवरून सायंकाळी सातला सुरू होणाऱ्या संक्षिप्त भागवत पारायणात अवश्य सहभाग घ्यावा.

या महत्त्वपूर्ण सेवेतून पीडा, बाधा, दोष यातून निश्चित मुक्तता मिळून मन:शांती लाभते. ज्यांना पुरेसा वेळ आहे, त्यांनी घरच्या घरी ‘संक्षिप्त भागवत’ या ७०० श्लोकी ग्रंथाचे अवश्य पठण करावे. या सेवेला एक तासभर वेळ लागतो, असे सांगून आपण सेवा करताना इतरांनाही ही सेवा सांगावी व त्यांना सेवेत सहभागी करून घ्यावे, असे गुरुमाउलींनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रत्येक एकादशीला पंढरपूरला वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. मोगलांच्या काळात हिंदूंची धार्मिक स्थाने उद्ध्वस्त केली जात होती. अशा परिस्थितीत तुळजापूरकरांनी आणि पंढरपूरवासीयांनी मूळ मूर्तींचे रक्षण केले.

नामदेव महाराज कीर्तन करताना पांडुरंगाची मूर्ती डोलू लागे, इतकी ताकद नामदेवांच्या निस्सीम भक्तीत होती. ही धार्मिक माहिती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वी भक्त शिरोमणी पुंडलिक समजून घेतला, तर वृद्ध माता-पित्याला वृद्धाश्रमात जाण्याची दुर्दैवी वेळ येणार नाही. त्यासाठी योग्य वयात मुलांवर सुसंस्कार होणे गरजेचे आहेत. या हेतूने सेवाकार्याने मूल्यसंस्कारांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

या विभागाप्रमाणेच प्रश्नोत्तरे, विवाह मंडळे, आयुर्वेद, कायदेशीर सल्लागार, स्वयंरोजगार, दुर्गसंवर्धन, बचतगट, कृषी, वास्तू, मराठी अस्मिता- भारतीय संस्कृती या विभागांच्या माध्यमातून समाज आणि राष्ट्रहितासाठी बहुविध उपक्रमांचे आयोजन केले जाते, असे सांगताना गुरुमाऊलींनी प्रत्येक सेवेकऱ्याला पाच झाडे लावण्याची आणि वृक्षसंवर्धन करण्याची आज्ञा केली.

श्रीयंत्र, रुद्रयंत्र, भूकंपशांती यंत्र, स्वसंरक्षण यंत्र, वादळ शमन ध्वज यांचे महत्त्व त्यांनी सांगितले. सुवृष्टी होण्यासाठी दररोज पर्जन्यसूक्ताचे पठण करा. मात्र, त्याबरोबरच आपल्या गावातील नद्या प्रदूषित होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना गुरुमाउलींनी केली.

प्रत्येक दत्तधामावर विवाह परिचय मेळावे घेण्यात येत असून, १६ जुलैला नांदेडमध्ये विवाह परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. गुरुमाउलींच्या हितगुजानंतर सेवेकऱ्यांनी पालखी सोहळ्यात आनंदाने सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT