A gymnasium that has been waiting for opening for five years. esakal
नाशिक

Nashik News: सावरपाड्यावरील व्यायामशाळेला 5 वर्षांपासून उदघाटनाची प्रतीक्षा!

आनंद बोरा

Nashik News : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत ही मूळची सावरपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील. कविताच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीमुळे ‘सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून जगभर ओळख झाली. अशा या सावरपाड्यावरील व्यायामशाळा ५ वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

व्यायामशाळेत अद्याप साहित्य पोचलेले नाही. दुर्लक्षामुळे व्यायामशाळेच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. तरुणाईला रस्त्याच्या कडेला व्यायाम करावा लागतो. त्यामुळे इथल्या तरुणाईमधून नाराजीचा सूर आवळण्यात येत आहे. (Gymnasium on Sawarpada waiting for opening for 5 years Nashik News)

पाड्यावरील मुले तंत्रज्ञानाशी जोडली जावीत म्हणून आदिवासी बांधवांनी संयुक्त वन समितीच्या माध्यमातून नदीवरील बंधाऱ्याचे काम करत जमलेले ३५ हजार रुपये जिल्हा परिषदेच्या शाळेला दिले. त्यातून डिजिटल स्कूल’ झाली.

पण या शाळेच्या बाजूला असलेल्या मुलांच्या स्वच्छतागृहाची अवस्था बिकट झाली आहे. त्याबद्दल ग्रामस्थ संताप व्यक्त करताहेत. सावरपाडा ग्रुप ग्रामपंचायतीतंर्गत कमुळी, पांगुळघर, जांभूळपाडा, वाळीपाडा, शेंद्रीपाडा, सावरपाडा, सादडपाडा, मुरूमहारी, फणसपाडाचा समावेश आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार इथली लोकसंख्या ४ हजार ३०६ होती. त्यामुळे सावरपाडा हे महसुली गाव असल्याने सावरगाव आणि मुरुमहारी या दोन पाड्यांची ग्रामपंचायत करावी असा ठराव गावाने केला आहे. दुसरीकडे इथल्या पोलिस पाटलांची दोन वर्षांपासून नेमणूक झालेली नाही.

मल्लखांबाचे प्रशिक्षण

मल्लखांब खेळणारे किसन गांगोडे हे तरुणांना मल्लखांबाचे प्रशिक्षण देतात. पण साहित्य उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दरम्यान, रोजगार हमी योजनेतून दिवसाला २२३ रुपये रोजगार मिळतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र नाक्यावर सातशे रुपयांचा रोजगार मिळत असल्याने सरकारच्या रोजगार विषयक योजनेच्या कामामध्ये सहभागी होण्यात स्थानिकांना फारसा रस नसल्याची माहिती पुढे आली आहे.

"व्यायामशाळा पाच वर्षांपूर्वी बांधली. तिचे अद्याप उदघाटन झाले नाही. ही वास्तू पडून आहे. त्यामुळे व्यायामशाळेसाठी झालेला खर्च वाया जाण्याची चिन्हे दिसताहेत. गावातील अनेक मुले विविध खेळ खेळतात. त्यांना मार्गदर्शनाची आवश्‍यकता असून योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे."

- अंबादास पवार, शेतकरी

"आम्ही गावातील शाळेला डिजिटल स्कूल’ बनवले. त्यासाठी आर्थिक मदत केली. मात्र शाळेच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था मिटण्याचा मार्ग काही केल्या दिसत नाही. स्वच्छतागृहाची दुरुस्ती व्हावी, अशी आमची मागणी आहे."- तुकाराम गांगोडे, शेतकरी

"आमच्या गावातून पूर्वी पेठकडे जाण्यासाठी रस्ता होता. तो रस्ता झाल्यास आजूबाजूच्या वीस पाड्यांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच गावातील विद्युत खांब धोकादायक बनले असून ते लवकर दुरुस्त व्हावेत."- अमृता राऊत, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघर साधू हत्याकांडाचे आधी आरोप केले, आता पक्षात का घेतलं? CM फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, भाजपकडून प्रवेशाला स्थगिती

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

CM Devendra Fadnavis: मित्रपक्षांना शत्रू समजू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, युती म्हणून एकत्र लढणार

Kolhapur News: कुरुंदवाडच्या रणांगणात कलाटणी! ठाकरे गट शाहू आघाडीसोबत; काँग्रेस ‘एकाकी’

Video Viral: वाहत्या पुरात हरीणाला हत्तीनं दिलं जीवनदान, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT