haj-yatra esakal
नाशिक

Haj Yatra 2023 : शहरातून पावणेचारशे भाविक हज यात्रेस रवाना

नाशिक : हज यात्रेस रवाना होताना मुस्लिम भाविक. फोटो : A05589

सकाळ वृत्तसेवा

Haj Yatra 2023 : शहरातील सुमारे पावणेचारशे भाविक हज यात्रेस रवाना झाले आहे. शहर- जिल्ह्यातून सुमारे सोळाशे भाविक यात्रेस जाणार आहे.

संपूर्ण देशातून १ लाख ७५ हजार भाविक हज यात्रा करणार आहे. यातील बहुतांशी भाविक सौदी अरेबियात दाखल झाले आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली. (Haj Yatra 2023 Devotees leave for Hajj Yatra nashik news)

बहुतांशी मुस्लिम बांधव शासकीय हज कमिटीमार्फत, तर काहीजण खासगी टूरच्या माध्यमातून जात असतात. गुरुवारी (ता.२९) बकरी ईद साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने मुस्लिम भाविक हज यात्रेस रवाना झाले आहे. शहरातून सुमारे ४०० भाविक, तर जिल्ह्याच्या इतर भागातून बाराशे भाविक यात्रेस जाणार आहे.

शहरातील ४०० भाविकांपैकी पावणेचारशे भाविक यात्रेस रवाना झाल्याची माहिती शहरातील हज कमिटीच्या सदस्यांकडून देण्यात आली. २१ जूनला शेवटचे विमान असणार आहे. सध्याही विविध भागातील मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी मुंबई येथील विमानतळाकडे जातानाचे चित्र बघावयास मिळत आहे. बहुतांशी भाविकांची ४० ते ४५ दिवसांची यात्रा असणार आहे. तर काही भाविक बकरी ईद होताच परतीच्या मार्गास लागणार आहे.

यंदा पूर्णपणे निर्बंधमुक्त यात्रा होत असल्याने मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या वर्षी हज यात्रेस येणाऱ्या खर्चात कमी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हज कमिटीमार्फत ३ लाख ९८ हजार २४७ रुपये लागले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यंदा कपात करून ३ लाख २१ हजार १८७ खर्च होणार आहे. जितकी रक्कम कपात करण्यात आली आहे. तितकीच रक्कम सबसिडी म्हणून यात्रेकरूंना यात्रेदरम्यान सौदी अरेबिच्या चलन अर्थात रियालच्या स्वरूपात परत मिळत होती.

शासकीय वैद्यकीय दाखला ग्राह्य

हज यात्रेस जाणाऱ्या भाविकांना आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करत तसेच यात्रेकरूंच्या तब्येतीची काळजी घेत वैद्यकीय चाचणी करून प्रमाणपत्र प्राप्त केले जाते. ते यात्रेदरम्यान बरोबर असणे आवश्यक आहे. दरवर्षी खासगी डॉक्टरांचेही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात होते. यंदापासून केवळ शासकीय वैद्यकीय दाखला ग्राह्य धरण्यात येत आहे. याशिवाय नियमित लसीकरण झालेले असावे.

"शहरातील बहुतांशी भाविक सौदी अरेबियातील धार्मिकस्थळी दाखल झाले आहेत. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत यात्रेचा खर्च कमी झाला आहे. त्यामुळे भाविकांना खिशातील पैसे खर्च रियाल घ्यावे लागणार आहे." - नहीम मुल्ला, हज कमिटी प्रभारी सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

Ayodhya Ram Mandir Flag : राम मंदिरात PM मोदी करणार ध्वजारोहण; सहा हजार पाहुणे होणार सहभागी, कशी आहे सुरक्षा व्यवस्था ?

Viral News : मंदिरात जाताच अवघ्या पाच मिनिटांत चोरीला गेले १६ हजारांचे शूज, संतापलेल्या इंजिनिअरला पुजाऱ्याकडून मिळाले 'हे' उत्तर

Latest Marathi Breaking News : बुलढाण्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

SCROLL FOR NEXT