HAL employee.jpg 
नाशिक

#Lockdown : ...अन् कामानिमित्त गेलेल्या 'त्या' युवकांच्या परतीच्या प्रवासाची परवानगी मिळाल्याने नातेवाइकांचा जीव भांड्यात पडला!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील एअरफोर्स कंपनीत कामानिमित्त गेलेले आणि लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स कंपनीचे 17 युवा कर्मचारी अखेर स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर नाशिकसाठी मार्गस्थ झाले. 

एक दिवसाचा जनता कर्फ्यू लागू झाल्यानंतर अडकून पडले

शनिवारी (ता. 21) परतीच्या प्रवासाला निघणारे हे कर्मचारी रविवारी (ता. 22) एक दिवसाचा जनता कर्फ्यू लागू झाल्यानंतर अडकून पडले होते. तसेच रेल्वे आणि खासगी वाहतूक बंद झाली. त्यानंतर मंगळवार (ता. 24)पासून संपूर्ण भारतच लॉकडाउन झाल्यामुळे सर्वच मार्ग व पर्यायी व्यवस्था बंद झाल्याने एका हॉटेलात हे कर्मचारी अडकून पडले होते. यामध्ये जल परिषदेचे सदस्य गीतेश्‍वर खोटरे (हिरडी त्र्यंबक), प्रशांत वाघेरे (शिरसगाव त्र्यंबक), पंढरीनाथ ठाकरे (ककाणी, कळवण), ओझर येथील मुकुंद शेटे, कपिल निफाडकर, अमोल इसापुरे, बाळासाहेब जाधव, प्रेमदास तितरमारे, वाल्मीक पाटील, विक्रम पाटील, प्रवीण देशमुख, प्रकाश प्रधान, नाशिक येथील प्रभाकर ढाकणे, प्रवीण राजोळे, सुमीत चार्वेकर, केतन मुठे, गणेश टर्ले आदींचा समावेश होता. 

परतीच्या प्रवासाची परवानगी

अचानक झालेल्या लॉकडाउनमुळे अडकल्याने घरच्यांसह नातेवाईक, मित्रमंडळी यांचा सतत संपर्क सुरू होता. याबाबत मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात कार्यरत असलेले पेठ तालुक्‍यातील आयएएस अधिकारी डॉ. योगेश भरसट यांना कोटंबी येथील शिक्षक संजय गवळी (तलवारे) यांनी माहिती दिल्याने त्यांनी ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी किशोर कन्हायाल, उपजिल्हाधिकारी शिवम वर्मा यांच्याशी संपर्क साधून परतीच्या प्रवासाची परवानगी मिळवून दिल्याने युवकांच्या नातेवाइकांचा जीव भांड्यात पडला. युवक परतीच्या प्रवासात असून, पहाटेपर्यंत ओझर येथे खासगी प्रवासी वाहनाने पोहचतील, असा अंदाज आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नैतिकतेला तडा! बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी आता भाजपचा स्वीकृत नगरसेवक, जनतेचा संताप उसळला...

Eknath Shinde : लाडक्‍या बहिणीच बदलतील कारभारी; शिवसेना उमेदवारांसाठी नाना पेठ, कात्रजमध्ये सभा

UPSC Interview Tips: UPSC मुलाखतीत काय विचारले जाते? जाणून घ्या बोर्डचे प्रश्न आणि सोपे टिप्स

Venezuelan oil India deal: अमेरिकेची मोठी खेळी! भारताला व्हेनेझुएलाचं तेल मिळणार, पण पैसे कोणाच्या खात्यात जाणार? धक्कादायक अट समोर

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड-सोलापूर दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT