Nampur Market Committee esakal
नाशिक

Nashik News: नामपूर येथील हमाल-मापारी भरती रद्द! बाजार समितीला नव्याने पदनिश्चितीचे कोर्टाचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

नामपूर : येथील बाजार समितीच्या माध्यमातून २०२१ मध्ये झालेली हमाल-मापारी भरती प्रक्रिया मुंबई येथील उच्च न्यायालयाने अखेर रद्द केली आहे.

हमाल-मापाऱ्यांची नव्याने पदनिश्चिती करण्यासंदर्भात पक्षकारांनी ४ डिसेंबरला सकाळी अकराला नाशिकच्या जिल्हा उपनिबंधकांसमोर हजर राहावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माधव जामदार यांनी दिले आहेत.

त्यामुळे बाजार समितीच्या माजी संचालक मंडळाला ‘जोर का झटका’ बसला आहे. (Hamal Mapari Recruitment Canceled in Nampur Court orders re appointment of market committee Nashik News)

या भरतीत मोठ्या प्रमाणात ‘अर्थपूर्ण’ हालचाली झाल्याची चर्चा होती. जुन्या हमाल-मापारींना विश्वासात न घेतल्याने पणन संचालकांपासून थेट उच्च न्यायालयापर्यंत नामपूर माथाडी कामगारांनी जोरदार लढा दिल्याने हमाल-मापारी भरती अखेर रद्द झाली आहे.

यापूर्वी पुणे येथील पणन संचालनालयाने ही भरती बेकायदेशीर असल्याने रद्दबादल ठरवली होती. त्यानंतर पणनमंत्री अब्दुल सत्तार यांचा भरती प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याने सुमारे दोन महिन्यांपूर्वी माथाडी कामगार युनियनचे हिंमत पगार यांनी बाजार समिती प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

त्यानुसार न्यायालयाने जुन्या हमाल-मापाऱ्यांच्या बाजूने निकाल देत वादग्रस्त हमाल-मापारी भरती रद्द केली.

लाचखोर जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे याने १२ ऑगस्ट २०२१ च्या आदेशान्वये नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्याने नियुक्ती करावयाची ५७ हमाल व १९ मापारी यांची संख्या निश्चित केली होती.

त्यानुसार बाजार समितीने हमाल-मापारी यांची भरती प्रक्रिया राबविली. या आदेशाविरुद्ध नामपूर बाजार समितीच्या हमाल-मापारी संघटनेचे प्रमुख हिंमत पगार, नितीन पगार यांनी बाजार समितीच्या निर्णयाविरोधात पुणे येथील पणन संचालकांकडे अपिल दाखल केले होते.

शासन निर्णयान्वये हमाल व मापाऱ्यांची कमाल संख्या एक लाख क्विंटल शेतमाल आवकेमागे सात हमाल व तीन मापारी अशी असावी, असे नमूद केलेले आहे.

बाजार समितीने जिल्हा उपनिबंधकांकडे ८१ हमाल व २७ मापारी यांना नवीन अनुज्ञप्ती देण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

तो दाखल करताना बाजार समितीने नामपूर मुख्य बाजार आवार व करंजाड उपबाजार आवारातील आवकेची एकत्रित स्थिती दाखवून बाजार समितीत हमालांची संख्या वाढविणे आवश्यक आहे, असे चुकीचे दर्शविले.

आवक आणि शासन नियमानुसार साधारणपणे १४ हमाल व सहा मापारी इतकी संख्या निश्चित होते. मात्र, जिल्हा उपनिबंधकांनी निश्चित केलेल्या संख्येबाबत कोणतेही स्पष्टीकरण नमूद केलेले नाही.

"उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे खूप समाधानी आहे. हमाल व मापारी यांना सद्यस्थितीत मिळणारे काम व वेतन याचा विचार करून माथाडी मंडळाने हमाल व मापाऱ्यांची संख्या कमी करून प्रति एक लाख क्विंटल आवकेस तीन हमाल व एक मापारी अशी करण्याची प्रमुख मागणी आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात त्यास अधिकृत मान्यता मिळेल, यासाठी प्रयत्नशील आहे."- हिंमत पगार, याचिकाकर्ते, माथाडी कामगार युनियन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT