woman-crying.jpg 
नाशिक

भय इथले संपत नाहीच! एका दिवसात तरुणीसह महिलेचा विनयभंग; पोलिसांत गुन्हा दाखल

विनोद बेदरकर

नाशिक : शहरात वेगवेगळ्या भागात महिलेसह मुलीचा विनयभंगाचा प्रकार उघडकीस आला. अल्पवयीन मुलीचा रस्ता अडवून एकाने लग्नाची गळ घालत तिचा विनयभंग केला. तर दुसऱ्या घटनेत नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साइटवर घरात झोपलेल्या महिलेचा गवंड्याने विनयभंग केला. याप्रकरणी मुंबई नाका आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 

लग्नास नकार देताच तरुणीची विनयभंग

गंजमाळ परिसरातील पंचशिलनगर भागात राहणारी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी (ता. ४) सायंकाळी मुलगी शिंगाडा तलाव रोडने शिवण क्लासला जात असतांना निखील कंडारे (रा.पंचशिलनगर) नावाच्या तरुणाने तिचा पाठलाग केला. मनोहर मार्केट रिक्षा थांब्यावर मुलीचा रस्ता अडवून संशयिताने तिला लग्नाची मागणी घातली. यावेळी मुलीने त्यास नकार दिला असता संशयिताने तिचा विनयभंग केला. तसेच यावेळी कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुसरी घटना : मखमलाबाद रोडवरील शांतीनगर भागातील

गामणे मळा येथे नव्याने सुरू असलेल्या रो हाऊस साइटवर महिलेचे कुटुंबीय वॉचमन म्हणून काम पाहतात. बुधवारी सायंकाळी महिला आपल्या घरात झोपलेली असतांना याच साइटवर प्लॅस्टर काम करणाऱ्या परप्रांतीय गवंड्याने तिचा विनयभंग केला. रामनरेश रामधारी यादव (५३ मुळ रा.उत्तरप्रदेश हल्ली अश्वमेधनगर,पेठ रोड) असे संशयिताचे नाव आहे. महिला घरात एकटी असल्याची संधी साधून संशयिताने तिच्या घरात प्रवेश करून विनयभंग केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिवाजी अहिरे करीत आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News :ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT