farm2.jpg 
नाशिक

शेतमळ्यामधील बांधावरच पिकाची खरेदी सुरू; शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा

खंडू मोरे

नाशिक : (खामखेडा)चालू वर्षी कोबी पिकाला चांगला दर मिळत असल्याने शेतात तयार शेतमाल बांधावरच व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे. शेतमळ्यामधील बांधावर कोबीची खरेदी सुरू झाल्याने काढणीसाठी व वाहतुकीसाठीच्या खर्चाची बचत होऊन शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होत आहे. 

शेतातच पैसा मिळत असल्याने उत्पादक शेतकरी खूश

दर वर्षी कोबी पिकास खरिपात सात-आठ रुपये भाव मिळतो. या वर्षी कोरोनामुळे पीक तयार झाल्यावर विक्रीसाठी अडचण येईल, या शक्यतेमुळे कोबीची लागवड कमी झाली. त्यामुळे सध्या कोबीला वीस रुपयांपर्यंत सरासरी बाजारभाव मिळत असल्याने कोबी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कसमादे परिसरात चालू वर्षी कोरोनामुळे कोबीच्या लागवडीवर परिणाम झाला. त्यामुळे व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन खरेदी करत आहेत. गावातच खरेदी करून हे व्यापारी थेट बाजारपेठेतच आपला माल विक्रीसाठी पाठवत आहेत. शेतातच पैसा मिळत असल्याने उत्पादक शेतकरी खूश आहेत. खामखेडा गाव व परिसरात कोबीचे हिरवेगार मळे प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

गावातील तरुण व्यापारात 

सध्या मोठ्या प्रमाणावर कोबी निघू लागल्याने या भागात व्यापारी दाखल होऊ लागले आहेत. तर गावातील काही स्थानिक तरुण गाव व परिसरातून शेतमाल खरेदी करून दिल्ली, अहमदाबाद, नोयडा या ठिकाणी व्यापाऱ्यांकडे पाठवू लागले आहेत. स्थानिक सात ते आठ तरुणांना व्यापाराची संधी मिळाली आहे. हे तरुण शेतातून चांगल्या प्रतीचा माल खरेदी करत व्यापाऱ्यांना पाठवत आहेत. व्यापारी शेतमाल स्थानिक मजूर लावून काढून घेतो. कोबी काढणी, गोणीत भराई, त्यांनतर ट्रॅक्टरमधून ट्रकमध्ये भराई या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मजूर लागत असल्याने स्थानिक दोनशेहून अधिक मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच मालाचे वजन केल्याबरोबर शेतकऱ्यांच्या हातात पैसा मिळत असल्याने शेतमालावर फुलणारा हा शेताच्या बांधावरील बाजार सध्या शेतकऱ्यांच्या सोयीचा व सुखाचा ठरत आहे. 

एक एकर कोबीसाठीचा खर्च 

एक एकर क्षेत्रासाठी ४० पुड्या आठ हजार रुपये, शेतीची मशागत लागवड पाच हजार रुपये, पिकाच्या फवारणीसाठी २५ हजार रुपये, असा ४० हजार रुपये खर्च होतो. तर एका एकरात २५ टन उत्पादन निघते. सरासरी १२ रुपये भाव असल्यास खर्च वजा जाता एकरी ६० दिवसांत दोन लाख रुपये उत्पादन मिळाले. 

शेतमाल विक्रीसाठी ना वाहतुकीचा खर्च ना दलालांशी किमतीसाठी घासाघीस. त्यामुळे केलेल्या मेहनतीचे चीज होत आहे. - नामदेव बच्छाव, शेतकरी, खामखेडा 

खामखेडा गावात चारशे एकरांवर कोबीचे क्षेत्र असून, गावातील व्यापारी असल्याने शेतकरी स्थानिक व्यापाऱ्यांना कोबी देतात. - नितीन मोरे, कोबी व्यापारी 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi speech Lok Sabha : होर्मुझमध्ये अडथळा कधीच...; लोकसभेत मोदींनी दिला स्पष्ट इशारा

IND vs AUS Test: भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेचा थरार, कांगारूंचा संघ वर्षभरात २० सामने खेळणार; पाहा वेळापत्रक

Gold Smuggling Case : 'या' अभिनेत्रीचं 100 कोटींचं 'गोल्ड कनेक्शन'; युगांडा ते दुबईपर्यंत पसरलेलं तस्करीचं जाळं उघड, ED च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

Latest Marathi News Live Update : सलग पाचव्या दिवशी SIT कडून गोपनीय ठिकाणी खरातची चौकशी सुरू

रेल्वेत टीसीच गैरवर्तन, प्रवाशाचं संतापून धक्कादायक कृत्य, मारहाण-धक्काबुक्की अन्...; Video Viral

SCROLL FOR NEXT