vadakte 1.jpg
vadakte 1.jpg 
नाशिक

रावळगावच्या वडक्ते कुटुंबीयांची हॅट्रिक! मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत दिली तिसऱ्यांदा संधी

सतीश निकुंभ

मालेगाव (जि.नाशिक) : रावळगाव (ता. मालेगाव) येथील वडक्ते कुटुंबाने ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाची हॅट्‍ट्रिक केली आहे. दत्तात्रय वडक्ते व त्यांच्या पत्नी जयवंताबाई वडक्ते यांच्या प्रभावी सामाजिक कार्यामुळे मतदारांनी कुटुंबीयांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे.

मतदारांनी कुटुंबीयांना दिली तिसऱ्यांदा संधी

दत्तात्रय वडक्ते यांनाही मतदारांनी यापूर्वी संधी दिली. त्यांनी तीन महिने सरपंच, तर १८ महिने उपसरपंच म्हणून काम पाहिले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग दोनमधून जयवंताबाई वडक्ते सर्वाधिक ४४५ मते मिळवून विजयी झाल्या.  त्यांच्या कार्यकाळात जलस्वराज्य योजनेंतर्गत जलकुंभ बांधण्यात आला. समाजमंदिराचे बांधकाम करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळाखोल्यांचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक आदी प्रभावी कामे त्यांनी मार्गी लावली. रावळगावला पाणीपुरवठा करणारा डंकीण तलाव ग्रामपंचायतीच्या मालकीचा होण्यासाठी पाठपुरावा केला.

आश्‍वासनांची पूर्ती करणार - वडक्ते

वडक्ते यांचा राममंदिराचे नूतनीकरण व वृक्षलागवडीत सहभाग राहिला. गावातील सामाजिक व धार्मिक कार्यात ते अग्रभागी असतात. जयवंताबाई सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या. मतदारांशी नेहमी जनसंपर्क ठेवत त्यांची कामे मार्गी लावल्याने ग्रामस्थांनी त्यांना पुन्हा संधी दिली. निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती केली जाईल, तसेच नागरिकांचे मूलभूत प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देऊ, असे  वडक्ते यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT