हेमंत माधव शिरोडे.jpg 
नाशिक

होय...'तो' आधुनिक श्रावणबाळच...आई बरी होण्यासाठी पंधरा वर्षांपासून करतोय धडपड!

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोवळ्या वयातच नियतीचे घाव झेलत शिक्षणाच्या स्वप्नांना हृदयात फुलविणाऱ्या तरुणाने अंथरुणाला खिळलेली आई...संधिवाताने त्रस्त वडील...वयोवृद्ध आजोबा आणि मोठा भाऊ या सर्वांची जबाबदारी पार पाडत अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण केले. कुटुंब हेच आपले विश्‍व समजून त्याने कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. आई अंथरुणाला खिळलेली का असेना पण तिने जन्म दिला आहे याची कृतज्ञतापूर्वक परतफेड करण्याचे त्याने ठरविले आहे. 

आईच्या काळजीपोटी घरात बसूनच काम सुरू

सातपूर परिसरातील जाधव संकुल परिसरात राहणाऱ्या हेमंत माधव शिरोडे याची घरची परिस्थिती बेताचीच...आईच्या आजारपणामुळे स्वच्छंद व मनमुराद खेळायचा आनंद नियतीने नवव्या वर्षीच हिरावून घेतला. अंगी अगदी साधेपणा असलेला हा मुलगा दहावीत 81 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता. अशातच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. महाविद्यालय सुरू असताना घरातील कामे आणि अभ्यास या दुहेरी मालिकेत त्याने कधीही हार मानली नाही. घरातील कामे आटोपून तो दिवसाआड महाविद्यालयात जात असे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर बीई कॉम्प्युटरमध्ये 72 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. आईच्या काळजीने त्याला कुणाशी मैत्रीचे ऋणानुबंधही निर्माण करता आले नाहीत. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या हेमंतने आईच्या काळजीपोटी बाहेर नोकरी न करता घरात बसूनच वेब डिझायनिंगचे काम सुरू केले आहे. 

असा आहे हेमंतचा दिनक्रम 

आईच्या प्रातर्विधीपासून तिला अंघोळ घालणे, घरातील सर्वांसाठी जेवण बनविणे, घरातील कामे आवरणे ही सर्व कामे एखाद्या गृहिणीप्रमाणे हा तरुण पंधरा वर्षांपासून करत आहे. आई, आजोबांना अंघोळ घालणे, वेळेवर जेवण, औषधे देणे अशी शुश्रूषा करतो. आई-वडील हे दैवत असल्याचे हेमंत आवर्जून सर्वांना सांगतो. 

आई आजारी असल्यामुळे तिची काळजी घेणे जबाबदारीचे काम आहे. आयुष्यात पैसा कधीही कमावू शकतो. पण एकदा गेलेले आई-वडील पुन्हा कधी परत मिळविता येऊ शकत नाहीत. - हेमंत शिरोडे, अभियंता 

हेमंत घरातल्या सर्वांची काळजी घेतो. कधीही मुलीची उणीव जाणवू देत नाही. कपडे, भांडे, स्वयंपाकापर्यंतची सर्व कामे करून वेब डिझायनिंगचे काम करत आहे, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. - माधव शिरोडे, वडील 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये पुन्हा बिबट्या दिसला

SCROLL FOR NEXT