blood letter 123.jpg 
नाशिक

VIDEO :...म्हणून 'त्याने' लिहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र...पाहा काय सांगतोय तरूण..

सागर आहेर

नाशिक : चांदोरी (ता.निफाड) येथील सचिन संजय कांबळे या युवकाने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांस रक्ताने पत्र लिहून आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा सगळा घाट त्याने कशासाठी केला असेल? वाचा सविस्तर

म्हणून त्याने लिहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र...

नेमके काय आहे त्या पत्रात...

"साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे सन २०२० हे जन्म शताब्दी वर्ष आहे. दिवंगत लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे (१९२०-१९६९) यांना देशभरातील जनता अण्णाभाऊ साठे या नावाने ओळखते. एका साधारण मातंग कुटुंबात जन्माला आलेल्या अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखणीतून दलित आणि कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली. सुमारे ३५ कादंबऱ्या, १५ कथासंग्रह, नाटक आणि पोवाडे अशी विपुल ग्रंथसंपदा अण्णाभाऊंनी निर्माण केली. जगभरातील २७ भाषांमध्ये त्यांच्या साहित्याची भाषांतरे करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे अनुयायी असणाऱ्या अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून दलितांच्या उत्थानासाठी प्रयत्न केले. त्यांच्या समाजकार्याचा गौरव करण्यासाठी ऑगस्ट २००२ साली भारतीय टपाल विभागाने, विशेष टपाल तिकीट प्रकाशित केले होते. या थोर समाजसेवकाला 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी गेल्या देशभरातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे,याच धर्तीवर चांदोरी (ता.निफाड) येथील सचिन संजय कांबळे या युवकाने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य बघून भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांस रक्ताने पत्र लिहून आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे."

साहित्य सम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेऊन जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भारत सरकारने त्यास भारतरत्न पुरस्कार द्यावा - सचिन संजय कांबळे, चांदोरी

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

Indian Army Rocket System: आता शत्रूंची खैर नाही! पोखरणमध्ये पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी; भारताच्या संरक्षणशक्तीला नवी उंची

'या' तारखेवर जन्मलेल्या लोकांचा एकमेकांशी असतो 36 चा आकडा ! भेटल्यावर भांडण होणारच

Exam Paper Theft: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्यानेच चोरली प्रश्नपत्रिका; सांगोला विद्यामंदिरात खळबळ..

SCROLL FOR NEXT