health ATM.jpg 
नाशिक

चक्क रेल्वेस्थानकावर 'इतक्या' चाचण्या?...अन् तेही 100 रुपयांत

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (नाशिकरोड) सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक जण करतात. त्यातही व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी यांचा बराचसा वेळ प्रवासात व कामातच खर्च होतो म्हणून प्रवाशां ची काळजी घेण्यासाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकात सध्या हेल्थ एटीएम बसविले आहे. त्याचे अनावरण नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

100 रुपयांत शरीरातील साखर आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण यासह बेसिक तपासण्या

तिकीटघराजवळच हे हेल्थ एटीएम स्थापन केले असून, आरोग्य तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीला नेमले आहे. यामध्ये 50-100 रुपयांत वेगळ्या महत्त्वाच्या आरोग्य चाचण्या केल्या जातात. 50 रुपयांत बेसिक टेस्ट केल्या जातात. त्यात वजन, उंची, रक्तदाब, चरबी, शरीराचे तापमान, बॉडी मास इंडेक्‍स, हाडांचा ठिसूळपणा या प्रकारच्या 14 चाचण्या नाशिक रोड रेल्वेस्थानकात केल्या जातात. त्याचप्रमाणे 100 रुपयांत शरीरातील साखर आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण यासह बेसिक तपासण्या केल्या जातात. 

हेल्थ एटीएम आशेचा किरण...

गेल्या चार दिवसांत 40 लोकांनी या हेल्थ एटीएमचा लाभ घेतला असून, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी बेसिक चाचण्या मोफत देऊ केल्या आहेत. प्रवाशांनी आरोग्याच्या चाच  केल्यानंतर त्याचा अहवाल लेखी स्वरूपात मिळतो. म्हणून डॉक्‍टरांना दाखविण्यासाठी सोयीचा मार्ग आहे. हमाल, रिक्षावाले आणि सामान्य व्यक्तींसाठी रेल्वेस्थानकावरील हेल्थ एटीएम आशेचा किरण ठरत आहे. अनेक वेळा प्रवासी दोन-तीन दिवस एकाच गाडीने प्रवास करतात. त्यांना आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. अनेक लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब याचा त्रास असतो. अशा व्यक्ती या हेल्थ एटीएमचा उपयोग करू शकतात, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anuskura Ghat Road Repair : कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास आता सुसाट! अणुस्कुरा घाटातील 25 किमी रस्त्याचे होणार मजबुतीकरण, 5 कोटींचा निधी मंजूर

Mumbai: दत्तक प्रक्रियेवर निर्णय देण्यास जिल्हाधिकारीही सक्षम, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Latest Marathi News Live Update : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला; बँकिंग क्षेत्रावर दबाव

Maharashtra Forest Land: राज्य सरकारचा निर्णय! वनजमिनींच्या नोंदी अद्ययावत होणार, प्रकल्पांना मिळणार गती, जिल्हाधिकाऱ्यांना काय दिले आदेश..

Parbhani News: केशर १२०, दशहरी १००, कर्नाटकी हापूस १५० रुपये किलो;परभणीच्या फळबाजारात आंब्याच्या दरात घसरण; सर्वसामान्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT