Jageuk Palak Sudhrud Balak esakal
नाशिक

Nashik News : 2 लाख बालकांची आरोग्य तपासणी; जिल्हयात जागरूक पालक सदृढ बालक योजनेला गती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हयात जागरूक पालक सदृढ बालक योजनेस ९ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. गेल्या सात दिवसात सुमारे २ लाख ०५ हजार १६२ बालकांची तपासणी झाली आहे.

दरम्यान, सध्या एकूण उद्दिष्टांपैकी १५ टक्के तपासणी पूर्ण झाली असून, संपूर्ण दोन महिने सुरू राहणाऱ्या या मोहिमेतून ०-१८ वयोगटातील सर्व बालकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. (Health checkup of 2 lakh children Acceleration of Aware Parents Strong Child Yojana in district Nashik News)

संपूर्ण राज्यात 'जागरुक पालक, सदृढ बालक, अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण,शहरी व मनपा विभागातील ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा, अंगणवाड्या, बालगृहे, समाजकल्याण व आदिवासी वसतिगृहे, खासगी शाळा, नर्सरी, तसेच शाळाबाहय मुलांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

या तपासणीत आजारी आढळणाऱ्या मुलांना औषधोपचार केले जात आहेत, तर ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांना ते उपचार दिले जात आहे. जिल्हयात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनात प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांच्या यंत्रणेने ७८२ शाळा आणि १ हजार १७८ अंगणवाडी केंद्रावरील शून्य ते सहा वयोगटातील ७८ हजार ८३२ बालकांची तपासणी केली आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

तसेच वयवर्षे सहा ते दहा या वयोगटातील एक लाख २१ हजार ३३० विद्यार्थ्यांची तपासणी झाली. ही टक्केवारी १५ टक्के इतकी आहे.

९ हजार २३९ बालके आजारी

९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान आरोग्य तपासणी झालेल्या बालकांमध्ये ९ हजार २३९ बालके आजारी आढळली आहगे. १६ हजार ४२९ बालकांना औषधोपचार करण्यात आलेले आहे. २ हजार ४४० बालकांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. २९० बालकांना शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात दाखल केले आहे.

"जागरुक पालक, सदृढ बालक अभियान राबविले जात आहे. यात शून्य ते अठरा वयोगटातील तपासणी केली जाणार आहे. जिल्हयात अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन महिने हा कार्यक्रम सुरूच राहणार आहे."- डॉ. हर्षल नेहते, जिल्हा आरोग्य अधिकारी,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT