नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शिवसेनेने अधिक ताकदीने मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार (ता. २२)पासून आरोग्याचा पंधरवडा उपक्रमांतर्गत मोहीम राबविली जाणार आहे. त्यात मधुमेह, रक्तदाब आजारांचे रुग्ण तपासण्यापासून रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जाणार आहे.
आजपासून आरोग्य पंधरवाडा
कोरोनाने शहराचा कोपरान्कोपरा कवेत घेतला असून, दररोज शेकडो रुग्ण आढळत आहेत. आयएमसीआरने आठ हजारांपर्यंत रुग्ण नाशिकमध्ये वाढतील, असे सांगितले होते. आता तो अंदाज कधीच ओलांडून दहा हजारांच्या पार रुग्णसंख्या पोचत आहे. महापालिकेच्या वतीने रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट वाढविण्यात आल्या असल्या, तरी नगरसेवकांची साथ मिळाल्यास अधिक चाचण्या वाढून पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार शक्य होणार आहे. त्या अनुषंगाने नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्या प्रभाग २५ मध्ये डॉक्टरांचे पथक तयार करून रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट सुरू केली. पहिल्याच दिवशी त्यांच्या तपासणीत सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. प्रभाग २८च्या नगरसेविका सुवर्णा मटाले यांनी संपर्क कार्यालय तपासणीसाठी खुले करून दिले.
...असे आहे नियोजन
आरोग्याचा पंधरवडा या उपक्रमांतर्गत प्रभाग सातमध्ये आरोग्य शिबिर होणार आहे. महापालिकेकडून रॅपिड ॲन्टिजेन किट, तर उर्वरित खर्च शिवसेनेच्या माध्यमातून होणार आहे. शंभर ऑक्सिमीटर, शंभर थर्मल गन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तपासणीसाठी वाटप केले जाणार आहे. स्थानिक डॉक्टर व त्या-त्या प्रभागातील रुग्णालयांची मदत घेतली जाईल. शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी, श्वसन आदींची तपासणी होईल. कोरोनाची लक्षणे आढळल्यास रॅपिड ॲन्टिजेन टेस्टदेखील केली जाणार आहे. या चाचण्या विनामूल्य केल्या जातील.
हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!
शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन
नाशिककरांनी शिवसेनेच्या आरोग्य शिबिरात सहभागी होऊन तपासणी करण्याचे आवाहन महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केले. शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख महेश बडवे, सचिन मराठे व शिवसेना गटनेते विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.