exam  esakal
नाशिक

Nashik News : 'MHADA'तील संशयित उमेदवारांमुळे आरोग्‍यची भरती परीक्षा वादात!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : म्‍हाडातर्फे घेण्यात आलेल्‍या पदभरती परीक्षेत गैरप्रकरणातील गुन्‍हा दाखल असलेले दोन उमेदवार महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या भरती परीक्षेला सामोरे गेल्‍याची माहिती समोर येत आहे. त्‍यामुळे ही परीक्षा वादात सापडली आहे. दरम्‍यान सर्व उमेदवारांचे कागदपत्र तपासून, व योग्‍य नियमावलीप्रमाणेच परीक्षा पार पाडल्‍याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. (Health recruitment exam in controversy due to suspected candidates in MHADA exam Nashik Latest Marathi News)

म्‍हाडा प्रकरणातील गुन्‍हा दाखल असलेल्‍या उमेदवारांच्‍या सहभागामुळे परीक्षेत बोगस (डमी) उमेदवारांचे रॅकेट सक्रिय असल्‍याचा संशय व्‍यक्‍त केला जात होता. यासंदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीतर्फे चौकशीची मागणी केली होती. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीतर्फे विद्यापीठाला परीक्षेतील गैरप्रकाराबाबतची माहिती कळविल्‍याचे सांगितले जाते आहे.

पंधरा संशयितांची नावे जाहीर करताना ‘म्हाडा’तर्फे घेतलेल्‍या परीक्षेतील गैरप्रकारात आढळल्‍याने गुन्‍हे दाखल असलेल्‍या दोन उमेदवारांची नावे आरोग्य विद्यापीठाच्या भरती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आढळून आल्‍याचा दावा समितीने केला आहे. यापैकी एक उमेदवार गुणवत्ता यादीत तिसऱ्या क्रमांकावर असल्‍याचे सांगतांना समितीने सखोल चौकशीची मागणी केलेली आहे. दरम्‍यान समितीच्‍या आक्षेपामुळे भरती प्रक्रिया वादग्रस्‍त ठरण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

विद्यापीठाने फेटाळले आरोप

याप्रकरणी विद्यापीठाने सर्व आरोप फेटाळलेले आहे. पारदर्शक व नियमावलीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली आहे. सर्व परीक्षार्थींचे आधारकार्ड पडताळून पाहताना, कुठल्‍याही स्‍वरुपाचे गॅझेट केंद्र परिसरात वापरण्यात आलेले नाहीत. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे सीसीटिव्‍ही फुटेज विद्यापीठाकडे उपलब्‍ध असून, कुठल्‍याही चौकशी समितीसमोर ती सादर करण्याची विद्यापीठाची तयारी असल्‍याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana : चिखला गावात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना, शिवभक्तांनी शनिवारी रात्री बसवला पुतळा; पाहा VIDEO

T20 WC : फायनल सोडा, पाकिस्तानचे उपांत्य फेरीत पोहोचणे अवघड झाले; न्यूझीलंडविरुद्धची लढत रद्द झाल्याने गणित बिघडले

'बॉलीवूड पूर्णपणे सोडायचे नव्हते पण...' प्रियांकाने सांगितलं बॉडिवूड सोडण्याचं खरं कारण, म्हणाली...

Santosh Deshmukh Case: खटल्यातील विलंबामुळे सरकारी पक्षाला तंबी; संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी

Solapur Dhule Highway Accident: चार दिवसांपूर्वी साखरपुडा, परीक्षेसाठी लातूरला निघाले अन् काळाने गाठले

SCROLL FOR NEXT