A tamarind tree near the Satwai temple in Dubere was uprooted due to pre-monsoon and strong winds. esakal
नाशिक

Nashik Pre Monsoon Rain: सिन्नर तालुक्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी; कही खुशी तो कही गम

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

Nashik Pre Monsoon Rain : सिन्नर तालुक्यातील अनेक गावात मान्सून पूर्व वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले होते तर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. (Heavy presence of Pre Monsoon rain in Sinnar taluka nashik news)

सिन्नर तालुक्यातील व शहरात शनिवारी दुपारी दोन वाजेच्या नंतर मान्सूनपूर्व वादळी पावसाने दस्तक दिल्याने अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी जमिनीत पाणी साचले होते, तर डुबेरे येथे महाकाय चिंच वृक्ष हा उन्मळून पडल्याने सटवाई मंदिरा जवळील डुबेर रोड हा काही तास बंद असल्याने वाहतूक बंद झाली होती.

ग्रामस्थांच्या मदतीने व जेसीबीच्या साह्याने महाकाय चिंचेचा वृक्ष हटवण्याचे काम हे युद्ध पातळीवर सुरू होते तालुक्यात मान्सून पूर्व वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक शेतात पाणी साचलेले होते.

चाळीचे पत्रे उडाले, पोलही पडले

राजापूर येथे आज वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी झाडे पडली. चाळीचे शेड व पत्रे उडाली आहेत. वीजपुरवठा खंडीत होऊन संपूर्ण परिसर अंधारात होता. दरम्यान सलग दोन दिवस पावसामुळे जमिन खरिपाच्या पेरणीसाठी मशागतीला तयार करण्याला वेग आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कालपासून खंडीत पुरवठा ४० ते ४५ तास सुरळीत झाला नव्हता. वाड्यावस्त्यावर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने हाल झाले. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी येथे राहत नसल्याने पुरवठा सुरळीत होण्यासाठी विलंब लागतो, त्यामुळे ग्रामस्थामध्ये संताप व्यक्त होत आहे.

वादळी पावसामुळे परिसरात व पन्हाळसाठे-रेंडाळा रस्त्यालगत मोठमोठे झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

येथील माजी सरपंच सुभाष वाघ, दत्ता सानप, सदस्य व ग्रामस्थांनी झाडे बाजूला करून रस्ता मोकळा केला परंतु नुकसान बरेच झाले आहे. घर, चाळ, शेततळे आदीच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

कांदा साठवणूक केलेल्या चाळीचे पत्रेही अनेक ठिकाणी उडाली आहेत. गणाधीश इंटरनॅशनल स्कूल शेजारी असलेल्या संतोषीमाता कृषी भांडार या दुकानाचे संपूर्ण शेड उडून तारेवर पडले. विद्यालयाजवळील शेडही शे दोनशे फूट उडून गेले होते, यामुळे मोठे नुकसान झाले आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजनाचे वीजपंप बंद असल्याने गावामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली.

दिवसभर वाढत्या उष्णतेने जीवाची काहोली होत असताना त्यातच दुपारी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळालेला आहे.

तर या पावसाने अनेक ठिकाणी लाखोचे नुकसान झाल्याचे समजते बळीराजाचे बाहेर ठेवलेला कांदाही भिजला असून. काही खुशी तो कही गम असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''मुंबईला चाललो म्हणून निघाले अन् रात्रीतूनच दिल्लीला गेले'', धनंजय मुंडेंच्या दिल्लीवारीची इनसाईड स्टोरी

IPL 2026 लिलावात अनसोल्ड राहिला, पण पठ्ठ्याने धीर नाही गमावला! देशासाठी नाबाद १७८ धावांची खेळी, २५ चौकारांचा पाऊस

Latest Marathi News Live Update : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

Women Joint Pain: महिलांना सतावतेय हिवाळ्यातील सांधेदुखी; योग्‍य तपासण्‍या, जीवनशैलीविषयक बदल करण्‍याचा तज्ज्ञांचा सल्‍ला

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रवासबंदीचा बडगा; आणखी वीस देशांच्या अमेरिकावारीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT