मूलवड (जि. नाशिक) : त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. परिसरातील नदी, नाले, ओसंडून वाहत आहेत. यामुळे वाघ नदीला पूर आला आहे. या पावसामुळे भुईमूग, उडीद, नागली, भातशेती ही खरिपाची पिके अतिवृष्टीमुळे धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
पै-पै जमा करून तयार केलेली शेती पाण्याखाली
मूलवडसह बेरवळ, रायता, ओझरखेड, वळण, करंजपाना, चौरापाडा व वाघ नदी किनाऱ्यावरील बेज, सावरपाडा या गावांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. परिसरातील सर्व घरांच्या भिंतीना ओलावा आला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रमाणही वाढले आहे. पशुधनांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे परिसरातील पिके पिवळी पडली आहेत. हा ढगफुटी सदृश पाऊस असाच सुरू राहिला तर हाताशी आलेली पिके निघून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व परीस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या शेतकरी वर्गाने उसनवारी घेत पै-पै जमा करून शेतीसाठी खर्च केला होता, परंतु अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे गणित बिघडून टाकले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.