rain esakal
नाशिक

Rain News : उत्तर महाराष्ट्रात आज उद्या जोरदार पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Rain News : उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये शनिवारी (ता. १६) आणि रविवारी (ता. १७) जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे नाशिक जिल्ह्यातील घाट विभागात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Heavy rain forecast in North Maharashtra today and tomorrow news)

नाशिक जिल्ह्यात १८ ते २० सप्टेंबरला मध्यम पावसाची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहणार आहे. तापमान कमाल २७ ते ३१, किमान २० ते २२ अंश सेल्सिअस, तर वाऱ्याचा वेग तासाला १५ ते २० किलोमीटर राहील, असे केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

जोरदार पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पक्व खरीप पिकांची काढणी, कापणी करून सुरक्षित जागेवर ठेवावे अथवा कापलेल्या पिकांना ताडपत्रीने झाकून ठेवावे, असा सल्ला केंद्राच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.

खानदेशातील जिल्हानिहाय पावसाच्या अंदाजांची स्थिती अशी : धुळे : शनिवारी (ता. १६)-काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस, रविवारी (ता. १७)-काही भागात जोरदार पाऊस, सोमवारी (ता. १८) आणि मंगळवारी (ता. १९)-हलका ते मध्यम पाऊस.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नंदूरबार : शनिवारी (ता. १६)-घाट भागातील काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस, रविवारी (ता. १७)-मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस, सोमवारी (ता. १८) आणि मंगळवारी (ता. १९)-मध्यम ते हलका पाऊस.

जळगाव : शनिवारी (ता. १६)-काही भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह जोरदार ते अतिजोरदार पाऊस, रविवारी (ता. १७)-मध्यम पाऊस, सोमवारी (ता. १८) आणि मंगळवारी (१९)-हलका ते मध्यम पाऊस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT