Nashik rain update esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; अनेक गावांमध्ये पुर परिस्थिती

नाशिक शहरासोबत जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहरासोबत जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. गंगापुर, दारणा, वालदेवी, पालखेड, पुनद, मुकने, कादवा, धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्याही दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली असून नदी- नाल्यांवरील पुल पाण्याखाली गेले आहेत.

नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

जिल्ह्यातील ४ महत्वाच्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने मुख्य नद्यांसह उप नद्यांना पुर आले आहेत. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नद्यांवरील पुल पाण्याखाली गेले आहेत.

दिंडोरी तालुक्यातील ६ ते ७ रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क यामुळे तुटला आहे. त्र्यंबकेश्वर, देवळा आणि निफाड तालुक्यात प्रत्येकी १ पुल पाण्याखाली गेल्याने नागरिकांपुढे मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत.

- जिल्ह्यातील धरणांमधून सद्यस्थितीत होत असलेला विसर्ग

दारणा धरण - 15,088 क्यूसेक

गंगापूर धरण - 10,000 क्यूसेक

कडवा धरण - 6,712 क्यूसेक

नांदूरमधमेश्वर धरण - 41,613 क्यूसेक

होळकर ब्रीज - 11,210 क्यूसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT