Nashik Rain Update : जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी (ता. १९) मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे.
मात्र, जिल्ह्यात सर्वदूर अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने धरणांतील साठा ६५ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणे ९३ टक्के भरली होती. (Heavy rain with lightning is forecast in district today nashik rain news)
गेल्या वर्षी आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे १०० टक्के भरली होती. यंदा आतापर्यंत भावली, वालदेवी, हरणबारी, केळझर ही धरणे ‘फुल्ल’ झाली आहेत.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात जलसंपदा विभागाने ९१ टक्के साठा ठेवला आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे धरणसाठा राखण्यावर जलसंपदा विभागाने लक्ष केंद्रीत केले.
सद्यस्थितीत दारणातून ५५०, वालदेवीतून ६५, नांदूरमधमेश्वरमधून १५१, हरणबारीतून १७३, केळझरमधून ७५ क्यूसेस विसर्ग करण्यात येत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
धरणांमधील साठ्याची टक्केवारी अशी : कश्यपी- ५९, गौतमी गोदावरी- ५८, आळंदी- ७५, पालखेड- ४४, करंजवण- ५८, वाघाड- ७३, ओझरखेड- ३७, पुणेगाव- ९२, तिसगाव- ०, दारणा- ९४, मुकणे- ७७, कडवा- ८६, भोजापूर- ६६, चणकापूर- ७८, गिरणा- ३७, पुनंद- ६१.
पावसाचा अंदाज
० २३ ऑगस्टपर्यंत- हलक्या पावसाची शक्यता आणि आकाश ढगाळ
० तापमान- कमाल २७ ते २९ आणि किमान २१ ते २२ अंश सेल्सिअस
० वाऱ्याचा वेग- तासाला १८ ते २१ किलोमीटर
(पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पुनर्लागवड केलेल्या व इतर खरीप पिकांच्या क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे पाणी साठविण्यासाठी उपाययोजना करावी.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.