Waterfalls in the ghat between Kasara and Igatpuri on the Central Railway & Dam overflow esakal
नाशिक

इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टी; मागील 5 वर्षांपेक्षा सरासरी दीडपट जास्त पाऊस

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : इगतपुरी शहरासह तालुक्यात गेल्या २४ तासांत १२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संततधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर अतिवृष्टीसह दाट धुक्याने वाहने संथगतीने धावत होती. (Heavy rains in Igatpuri taluka Average rainfall is one half times higher than last 5 years Nashik Latest Marathi News)

दारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग.

पावसामुळे भात पिकाची मोठी हानी होणार आहे. या वर्षीही सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला आहे. तब्बल २० ते २५ दिवसांत धरणे भरण्यास सुरवात झाली होती. दोन महिन्यांत जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची आकडेवारी असलेल्या या तालुक्यात सरासरी ओलांडली. एवढेच नव्हे, तर गेल्या २० ते २२ वर्षांतील विक्रम मोडीत तालुक्यात चक्क ४,५०० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली.

तालुक्यात सुरवातीपासूनच भात पीक पाण्याखाली गेले होते, तर पूर्वपट्ट्यातील भात पाण्यात वाहून गेला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भाताचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पूर्व भागात तर शेता शेतात पाणी, तसेच घराघरांतही पाणी शिरले. तालुक्यातील सर्व धरणे पूर्णक्षमतेने भरून वाहू लागली आहेत. दारणा, काडवा, मुकणे, भाम, भावली, वाकी धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्गही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Latest Marathi News Updates : विद्या सहकारी बँकेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर

SCROLL FOR NEXT