Bottles everywhere in garden
Bottles everywhere in garden esakal
नाशिक

Nashik News : हेडगेवारनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रंगतात रात्रीच्या ओल्या पार्ट्या!

सकाळ वृत्तसेवा

विकास बाविस्कर : सकाळ वृत्तसेवा

हेडगेवारनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरवस्था झालेली असून हे बाळगोपाळांना खेळण्यासाठी आहे की मद्यपींच्या रात्रीच्या पार्ट्यांसाठी आहे, असा प्रश्न स्थानिक रहिवासी उपस्थित करत आहेत. स्थानिक पोलिसदेखील या गंभीर बाबीकडे काणाडोळा करत असल्याचा थेट आरोप करण्यात येत आहे. (Hedgewar Nagar Dr Babasaheb Ambedkar Park drinking parties at night nashik news)

परिसरातील महिला स्वतःस सुरक्षित समजत नसून मद्यपी या उद्यानात टोळक्यांच्या स्वरूपात येऊन उघड्यावर येथे मद्यप्राशन करत असून अमली पदार्थांचे सेवनदेखील करत असतात. उद्यानात मद्याच्या बाटल्या फोडल्या जातात. मुले येथे खेळण्यासाठी आले असता, त्यांना यामुळे दुखापत होते.

ज्येष्ठ नागरिकदेखील उद्यानात विरंगुळा म्हणून आल्यानंतर त्यांना गावगुंडांच्या त्रासास सामोरे जावे लागते. उद्यानातील काही खेळणी तुटलेल्या अवस्थेत असून त्या मुलांना खेळण्याच्या लायकीच्या उरलेल्या नाहीत. तर काही खेळण्या थोड्या प्रमाणात तुटलेल्या असल्या तरी त्यामुळे इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेडगेवारनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान

* उद्यानातील काही खेळणी पूर्णतः तुटलेल्या
* काही खेळण्यांमुळे बाळगोपालांना इजा होण्याची शक्यता
* उद्यानात मद्यपींचा धुमाकूळ
* उद्यानात उघड्यावर केले जाते मद्यप्राशन
* कचरा उघड्यावर जाळण्याचे प्रकार
* कचरा उचलून नेण्याची तसदी मनपा कर्मचारी घेत नाहीत.

"उद्यानात लहान मुलांना एकटे सोडण्यास प्रचंड भीती वाटत असते. महिलांनादेखील सुरक्षित वाटत नसून येथे सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे अत्यावश्यक आहे."- आशाबाई खोंडे, गृहिणी

"उद्यान देखभालीकडे लक्ष देणे गरजेचे असून येथील तुटलेल्या खेळणी दुरुस्त करण्यात येत नसल्याने उद्यानाचा उपभोग घेता येत नाही. येथील खेळण्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यायला पाहिजे."- लता गवळे, गृहिणी

"लहान मुलांच्या खेळण्यासाठी अजून सुखसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. खेळण्यांच्या अभावामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी इतरत्र घेऊन जाण्याची नामुष्की आमच्यावर येत असून ते म्हणतात ना ‘काखेत कोळसा आणि गावाला वळसा, अशी स्थिती येथील संपूर्ण रहिवाशांची झाली आहे." - प्रियांका सानप, गृहिणी

"उद्यान म्हणजे फक्त लहान मुलांसाठी नसते. आम्ही ज्येष्ठ नागरिकदेखील विरंगुळा म्हणून उद्यानात जातो. मात्र, येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी व्यवस्थित जागा नसल्याने उद्यानाच्या गवतावर बसावे लागते. मात्र येथे पाणी मारलेले असल्याने तेथेदेखील बसण्याच्या अडचणी होतात. त्यामुळे आमच्यासाठी काही व्यवस्था व्हायला हवी."
- हिराबाई सुतार, ज्येष्ठ नागरिक

"उद्यान लहान मुलांसाठी की मद्यपींसाठी असा, प्रश्न उपस्थित होत असून येथे रात्री ओल्या पार्ट्या सुरू असतात. उद्यानात फेरफटका मारल्यानंतर अनेक ठिकाणी मद्याच्या बाटल्या दिसून येत असतात. कारवाई करण्यात यावी." - दीपाली देशपांडे, गृहिणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT