Helmetless and triple seat driver against action by traffic police nashik news  esakal
नाशिक

Nashik News : विनाहेल्मेट, ट्रिपल सीट वाहनचालक ‘रडार’ वर; 16 लाखांचा ऑनलाइन दंड

शहरात अपघातांमध्ये दुचाकीस्वाराचा सर्वाधिक मृत्यू होत आहेत. १०६ मयत व २६९ दुचाकीस्वार जखमी झालेले आहेत.

सकाळ वृतसेवा

Nashik News : शहरात अपघातांमध्ये दुचाकीस्वाराचा सर्वाधिक मृत्यू होत आहेत. या अपघाती मृत्यूला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून गेल्या आठवडाभरात विशेष मोहीम राबवीत विनाहेल्मेट, ट्रिपल सीट वाहनचालकांविरुद्ध ऑनलाइन दंडात्मक कारवाई करीत तब्बल १६ लाख २९ हजारांचा ऑनलाइन दंड वसूल आकारण्यात आला आहे.(Helmetless and triple seat driver against action by traffic police nashik news)

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या उपस्थितीत झालेल्या अपघातांच्या आढावा बैठकित नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील झालेल्या दुचाकी वाहनांचे अपघातांचा आढावा घेण्यात आला. जानेवारी २०२३ ते नोव्हेंबर २०२३ अखेर नाशिक शहरात एकूण ४२६ अपघात झाले असून, त्यापैकी ३३९ दुचाकीचालकांचा अपघात झाला आहे.

त्यामध्ये १०६ मयत व २६९ दुचाकीस्वार जखमी झालेले आहेत. शहरात वाढणाऱ्या रस्ते अपघातामध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. तसेच वाहनांवर ट्रिपल सीट प्रवास करू नये याकरिता शहर वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येते.

परंतु विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याच्या प्रमाणात घट न होता दुचाकी स्वाराच्या अपघातात वाढ होवुन दुचाकी वाहनचालक मयत होण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. शहर वाहतूक शाखेच्या युनिट १ ते ४ च्या कार्यक्षेत्रात गेल्या ७ ते १५ डिसेंबरदरम्यान विनाहेल्मेट व ट्रिपल सीट प्रवास न करण्यासाठी, तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालविणे याविरुद्ध राबविण्यात आली.

त्यामध्ये शहर वाहतूक शाखा युनिट १ ते ४ मध्ये विनाहेल्मेट २ हजार २४४ कारवाई करीत ११ लाख २२ हजार दंड, तसेच ट्रिपल सीटच्या २१५ केसेस करून २ लाख १५ हजारांचा दंड तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालविणे ६१३ केसेस करून ३ लाख ६ हजार ५०० रुपये असा एकूण १६ लाख २९ हजार २००-रुपये ऑनलाइन दंड आकारण्यात आलेला आहे.

युनिटनिहाय दंडात्मक कारवाई

युनिट......विनाहेल्मेट...राँगसाइड...ट्रिपल सीट...एकूण केसेस....दंड (रुपये)

युनिट-१....७००......२८......५४......७८२.....४,१८,०००

युनिट-२....६६२......४७९.....१०९.....१२५०....६,७९,५००

युनिट-३....५६६......३५......२४......६२५.....३,२४,२००

युनिट-४....३१६......७१......२८......४१५.....२,०७,५००

एकूण :....२२४४.....६१३.....२१५.....३०७२....१६,२९,२००

''दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे तसेच ट्रिपल सीट प्रवास करू नये. चुकीच्या दिशेने वाहन चालवू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.''- डॉ. सचिन बारी, सहायक आयुक्त, वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjaykaka Patil Sangli : संजयकाका पाटील पुन्हा भाजपवासीय होणार, चंद्रकांत दादा सुनेत्रा पवारांचे नाव घेत म्हणाले, तासगावचे राजकारण पुन्हा बदलणार

IPL 2026: 'तूझे सिक्रेट्स अन् आतल्या गोष्टी माहितीयेत, त्यामुळे ...' वैभव सूर्यवंशीसोबतच्या चर्चांवर ईशान किशानचा खुलासा

श्रेया घोषालने 3 महिन्यात खरेदी केली 3 आलिशान घरं, किंमत ऐकून थक्क व्हाल, नेटवर्थ आहे तब्बल 'इतक्या' कोटींचं

Latest Marathi News Live Update: कोंढापुरीत भीषण आग; गॅस सिलेंडर स्फोटाने घर भस्मसात

Mumbai News: मिठीतील भ्रष्टाचारावर प्रशासन गप्प का? स्थायी समितीत तीव्र पडसाद

SCROLL FOR NEXT