High Level Committee for Revision of Surat Chennai Greenfield Highway Land Acquisition Compensation nashik news esakal
नाशिक

Nashik News : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग भूसंपादन मोबदला फेरविचारास उच्चस्तरीय समिती

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठीच्या भूसंपादन मोबदल्याबाबत फेरविचार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

भूसंपादनाच्या अत्यल्प मोबदल्याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी (ता. १७) नवी दिल्लीत झालेल्या बैठकीवेळी पवार यांनी सुचविल्यानुसार माजी जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. (High Level Committee for Revision of Surat Chennai Greenfield Highway Land Acquisition Compensation nashik news)

समिती तीन महिन्यांत अहवाल देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार आणि गोकुळ पिंगळे यांनी दिली. ते म्हणाले, की नाशिकसह अहमदनगर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यांतील शिष्टमंडळासह ‘न्हाई’चे अधिकारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश शिंदे आदी बैठकीसाठी उपस्थित होते.

महामार्गासाठी प्रशासनाने भूसंपादनाचा अत्यल्प मोबदला देऊन शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, नाशिक, दिंडोरी, सुरगाणा या पाच तालुक्यांतील ९९६ हेक्टर जमीन बाधित आहे. भूसंपादनाचा मोबदला घेण्यास शेतकरी तयार नाहीत. त्यांनी महामार्गाला विरोध दर्शविला आहे. या प्रश्‍नावर ३ ऑक्टोबरला शेतकऱ्यांनी पवार यांची भेट घेतली होती. त्याचवेळी गडकरी यांची भेट घेऊन प्रश्‍नाची तड लावण्याचा शब्द पवार यांनी दिला होता. त्याप्रमाणे ही बैठक झाली.

पिंगळेंची सूचना मान्य

राष्ट्रीय महामार्गावर ‘स्पीड गन' लावण्यात आल्या असून, ४० व ६० किलोमीटर ‘स्पीड'चे फलक लावण्यात आले आहेत. महामार्गावर वाहने भरधाव असताना ४० व ६० किलोमीटरची मर्यादा योग्य नसून, ‘स्पीड गन’कडून वाहनधारकांची लूट केली जात आहे, असे पिंगळे यांनी बैठकीत सांगितले. त्याची दखल घेत गडकरी यांनी महामार्गावर ८० ते १०० किलोमीटरपर्यंतची वेगमर्यादा यापुढे ठेवावी, ४० ते ६० किलोमीटरचे फलक असल्यास ते काढून टाकण्याची सूचना त्यांनी ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांना केली.

"सुरत-चेन्नई महामार्गाबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत सकारात्मक बैठक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार आहे." - गजानन शेलार, कोंडाजीमामा आव्हाड, गोकुळ पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT