bhujbal25.jpg 
नाशिक

''साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मानच''

सकाळवृत्तसेवा

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्य मंडळाने केलेली माझी निवड हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता. 26) रोजी व्यक्त केली. 

संमलेन नक्कीच ऐतिहासिक होईल

छगन भुजबळ म्हणाले की, कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांनी वास्तव केलेल्या पुण्यभूमीत यंदा मराठी साहित्यिकांचा मेळा भरत आहे. याचा एक नाशिककर म्हणून मला अतिशय आनंद आहे. तसेच या संमेलनाच्या अध्यक्षपदी आपण ज्येष्ठ शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ.जयंत नारळीकर यांची निवड केली आहे. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी आपण माझी निवड करण्यात आली हा माझ्यासाठी मी सर्वोच्च असा सन्मान समजतो असे म्हटले आहे. तसेच नाशिकमध्ये होणारे हे साहित्य संमलेन नक्कीच ऐतिहासिक होईल यात कुठलीच शंका नाही. 

साहित्य संमलेन उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले जाईल...

नाशिककर म्हणून या अगोदरच आपण जबाबदारी स्विकारली आहे. आता स्वागताध्यक्ष म्हणून आपण माझ्यावर सोपवलेली जबाबदारी स्विकारण्यास मी तयार असून नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे, साहित्यिकाचे व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या तमाम नागरिकांचे या नाशिक नगरीत स्वागत करण्यास आपण कुठलीही कमतरता राहू देणार नाही. तसेच आपणा सर्वांच्या सोबतीने हे मराठी साहित्य संमलेन उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले जाईल असा विश्वास व्यक्त करतो असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलतांना माजी आमदार हेमंत टकले म्हणाले की, साहित्य क्षेत्राची आवड असलेले आणि समाजसेवी व्रत जोपासणारे व्यक्ती म्हणून नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या स्वागताध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली आहे. आपली झालेली ही निवड आमच्यासाठी अंत्यत आनंदाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सोमवारी (ता. 25) स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन सन्मान केला. या बैठकीला माजी आमदार तथा विश्वस्त हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, अॅड. विलास लोणारी, डॉ.कैलास कमोद, संजय करंजकर, शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, गिरीश साळवे, मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT