NMC Nashik News
NMC Nashik News esakal
नाशिक

Nashik News : Hoardingस्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यास टाळाटाळ; आकडेवारीवरून गोंधळाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात उभारण्यात आलेल्या ८४५ होर्डिंग्ज पैकी ६५० होर्डिंग्जची स्थिरता (स्टॅबिलिटी) प्रमाणपत्र सादर करण्यात आले असून, अद्यापही १९५ होर्डिंग्जचे प्रमाणपत्र सादर न झाल्याने महापालिकेकडे नोंद असलेली व प्रत्यक्षात लावण्यात आलेल्या होर्डिंग्जमध्ये तफावत असल्याचा संशय विविध कर विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

ज्या होर्डिंग्जचे प्रमाणपत्र सादर करण्यात आले, त्या होर्डिंग्जची जागेवर जाऊन तपासणी करताना आकारदेखील तपासला जाणार आहे. (Holdings Stability Certificate Reluctance to submit Potential for confusion over statistics Nashik News)

पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीत होर्डिंग कोसळून दुर्घटना घडल्याने यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महापालिका हद्दीमधील होर्डिंग्ज स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थिरता प्रमाणपत्र) तपासणीच्या सूचना दिल्या.शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने तत्काळ कारवाई करणे अपेक्षित होते.

परंतु विविध कर विभागातील होर्डिंग्ज धारकांशी अनेक वर्षांपासूनच्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून शासन आदेशाची अंमलबजावणी केली नाही.

नव्याने पदभार घेतलेल्या प्रशासन उपायुक्त श्रीकांत पवार यांनी मात्र शासनाच्या पत्राची गंभीर दखल घेत, महापालिकेकडे नोंद असलेल्या ८४५ होर्डिंग धारकांना नोटिसा पाठविल्या.

त्यात सुरवातीला वीस तर आता नव्याने २४ जूनपर्यंत होर्डिंग धारकांना स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १९ जूनपर्यंत ८४५ पैकी ६५० होर्डिंग्ज धारकांनी विविध कर विभागाकडे स्थिरता प्रमाणपत्र सादर केले आहे.

अद्यापही १९५ होर्डिंग्जचे स्थिरता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही. २४ जूननंतर विविध कर विभागाकडून प्रमाणपत्र सादर न केलेल्या होर्डिंग्ज धारकांवर कारवाई करणार आहे, त्याशिवाय ज्या होर्डिंग्ज धारकांनी प्रमाणपत्र सादर केले.

त्या होर्डिंग्जची जागेवर जाऊन पाहणी करण्याबरोबरच जिओ टॅगिंग देखील केले जाणार आहे. शहरात अधिकृतपणे उभारण्यात आलेली होर्डिंग ज्या ठिकाणी परवानगी दिली तेथेच उभारण्यात आली आहे का, हे तपासले जाणार आहे. ऑगस्टअखेर जिओ टॅगिंग लावले जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘मापात पाप’ तपासणार

विविध कर विभागाकडे परवानगी घेताना होर्डिंग्जचे दर्शविलेले माप व प्रत्यक्षात जागेवर असलेले होर्डिंग्जचे माप यात तफावत आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर करताना मापाचेदेखील उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

त्याचबरोबर काँक्रिट पिलरचेदेखील माप व तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, अद्यापही १९५ होर्डिंग्जचे स्थिरता प्रमाणपत्र सादर न झाल्याने उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जची जागा व संख्येवरून संशय निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samata Parishad : छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी?

T20 World Cup: अमेरिकेकडून खेळणाऱ्या हरमीतने रोहितच्या कोचला दिलं श्रेय! म्हणाला, 'त्यांनीच माझ्यात...'

Mumbai Local : गुड न्यूज! मुंबई लोकल धावणार 'टाईम टू टाईम', रेल्वेकडून 'हे' मोठे बदल

Jonty Rhodes : गंभीर 2019 पासूनची परंपरा मोडणार; जॉन्टी रोड्स होणार टीम इंडियाचा नवा फिल्डिंग कोच?

Rajeev Karandikar Debate : ईव्हीएम प्रकरण न्यायालयात; मशीन हॅक करता येते की नाही या प्रश्नावर राजीव करंदीकर काय म्हणाले? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT