rent tenant.jpg
rent tenant.jpg 
नाशिक

घरमालकांनो! भाडेकरूंची माहिती द्यायची आहे..कारण...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षात्मक उपाय म्हणून जिल्ह्यात भाड्याने घर देणाऱ्या घरमालकांनी भाडेकरूंची आणि आपल्या भागात असलेल्या अनोळखी व्यक्तींची माहिती जिल्हा प्रशासनास देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून आवाहन 

घरमालक वा घराचे वहिवाटदार असलेल्यांनी मालकीची वा ताब्यातील घरे उदाहरणार्थ फ्लॅट, खोली, बंगला, शेड आदी संबंधित भाडेकरू, पोटभाडेकरू वा भाडेपट्टी कराराने घेणाऱ्या व्यक्तींची माहिती, जुने व नवीन चारचाकी, दुचाकी वाहने खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक, फेरीवाले, सीमकार्ड विक्रेते, सायबर कॅफे, भंगार खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रास मनुष्यबळ पुरविणाऱ्या एजन्सी, ज्वालाग्रही पदार्थांचे साठेधारक, शस्त्र व दारूगोळा, स्फोटक परवानाधारकांनी नाशिक ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्राच्या पोलिस ठाण्याकडे विहित नमुन्यात लेखी दिल्याशिवाय संबंधितांना घरे भाड्याने देऊ नये, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिले आहेत. संबंधित आदेश 13 मार्च 2020 पर्यंत अमलात राहतील. 

जिल्ह्यात शस्त्रबंदी, जमावबंदी 
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी 29 जानेवारीपर्यंत रात्री 12 पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हे आदेश लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रम, आठवडेबाजारस लागू नाहीत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT