stamp.jpg 
नाशिक

धक्कादायक! आता क्वारंटाईन ओळखणंही अवघडच झालंय राव...कारण..

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोनाच्या या संकट समयी तुम्हांला अचानक भयानक काय ऐकायला मिळेल याचा काय नेम नाही? हा विनोद वाटला तरी गंभीर प्रश्न म्हणून तुम्हाला त्याकडे नाईलाजाने बघावं लागेल एवढं मात्र खरं ! तुम्ही विचारही करू शकत नाही असंच काहीसं घडलंय आणि ते म्हणजे रुग्णाला होम क्वारंटाईन करण्यासाठी हातावर मारण्यात येणाऱ्या शिक्क्याची म्हणे शाईच संपली आहे...नेमका काय प्रकार? 

तोंडीच सूचना करण्याचा प्रकार 

सिडकोसह नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर त्यांच्या सानिध्यात असणाऱ्यांची संख्या पाच ते दहा पटीने दिसून येत आहे. यामुळे या सर्व संशयितांना होम क्वारनटाईन करण्यात येते. तत्पूर्वी त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्काही मारण्यात येतो. या शिक्यासाठी विशिष्ट प्रकारची शाही वापरली जाते. मात्र आता सिडको विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडील नेमकी तिच शाई संपली आहे. त्यामुळे होम क्वारंटाईन करण्याचे प्रकार तोंडी सांगून केले जात आहेत. 

स्वत:ची काळजी आवश्‍यक 

संशयित रुग्ण बिनधास्तपणे फिरत असतील तर त्यांना ओळखणे कठीण आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी लागणाऱ्या सर्वप्रकारच्या साधन सामुग्रीप्रमाणे प्रशासनाने शिक्क्यांसाठी लागणारी शाईसुद्धा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी सर्वसामान्य नाशिककरांकडून होऊ लागली आहे. तोपर्यंत आपण आपली स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्तीच्या सानिध्यात किंवा बाहेर गावावरून आली तर त्यास 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येते. त्याकरता त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येतो. त्याकरिता विशिष्ट प्रकारची शाई वापरली जाते. या शाईचे वैशिष्ट्य म्हणजे पुढील 14 दिवस शाई पुसली जात नाही.

पोलीसांत गुन्हे दाखलची शक्यता 

सदर व्यक्ती बाहेर बिनधास्तपणे फिरत नाही. आणि फिरत असेल तर अशावेळी त्याच्या हातावरचा हा शिक्का आपणांस तो होम क्वारंटाईन असल्याचे निदर्शनास आणून देतो. त्यामुळे अशा व्यक्तीवर पोलीस गुन्हा देखील दाखल करू शकतात. थोडक्यात काय तर हा शिक्का म्हणजे संबंधित व्यक्तीने इतर व्यक्तींशी भेटीगाठी घेऊ नये. जेणेकरून तकोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT