mokhada.jpg 
नाशिक

धक्कादायक! पुलाखाली संशयास्पदरित्या आढळले इंजेक्शन, औषधं अन् वेस्टेज; वाचा सविस्तर प्रकार

ज्ञानेश्वर मेढे

नाशिक  / अंबोली : घाटातील मोठ्या पुलाच्या खाली अर्धवट वापरलेल्या सीरिंज, औषधी आणि हाॅस्पिटल वेस्टेजचा मोठ्या प्रमाणावर साठा कुठलीही विल्हेवाट न लावता बेवारसपणे टाकून दिलेला आहे. संशयास्पद प्रकार पाहून ग्रामस्थांमध्येही भितीचे वातावरण आहे.

अर्धवट वापरलेली औषधे मोरांडा परिसरात पुलाखाली 
मोरांडा (ता. मोखाडा) परिसरात घाटातील मोठ्या पुलाच्या खाली अर्धवट वापरलेल्या सीरिंज, औषधी आणि हाॅस्पिटल वेस्टेजचा मोठ्या प्रमाणावर साठा कुठलीही विल्हेवाट न लावता बेवारसपणे टाकून दिलेला आहे. त्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांना त्रास होऊ शकतो, तसेच परिसरातील विविध पाडे, गावांतील जंगलात फिरणारे गुराखी, मुले यांनाही त्यापासून इजा होऊ शकते. त्यामुळे या बेजबादारपणाबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा

त्र्यंबकेश्वर येथील आरोग्य अधिकारी योगेश मोरे यांनी याबाबत माहिती मिळताच अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक घोरसडे यांना माहिती दिली. श्री. मोरे व घोरसडे तत्काळ या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी शहानिशा करून पडलेल्या औषधांचा अंदाज घेतला असता, त्यामध्ये सीरिंज, नीडल, इंजेक्शन डेक्सा व्हायलेट, डौक्लोफेनल, अस्तलीन, मल्टिविटमिन, आयव्ही सलाइन, टॉनिकच्या बॉटल आदी अर्धवट वापरलेले साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळले. संबंधित पूल आणि हा परिसर मोखाडा पोलिसांच्या हद्दीत असल्याने येथील पोलिस निरीक्षक संजय आम्रे व त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अशी अर्धवट वापरलेली औषधे येथे टाकणाऱ्याचा शोध घेणार असून, संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.  

बेजबाबदारपणा उघडकीस

दवाखान्यांमध्ये अर्धवट वापरलेली औषधे मोरांडा (ता. मोखाडा) परिसरात एका पुलाखाली अनधिकृतरीत्या फेकून दिल्याचे आढळले आहे. अत्यंत बेजबाबदारपणे टाकलेल्या या औषधांपैकी काही वाहत्या पाण्यासोबत वाहून गेल्याचेही स्पष्ट होत आहे. 

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT