kumbharwada fire 1.png 
नाशिक

क्षणार्धात संसाराची राखरांगोळी! चव्हाण कुटुंबियांचे ५० हजारांचे नुकसान 

यूनुस शेख

नाशिक : कुंभारवाडा परिसरातील शितळादेवी मंदिर परिसरातील सुरेश चव्हाण यांचे कुटुंब राहत होते. दुपारच्या वेळी अशी घटना घडली. ज्यामुळे काही क्षणातच संसाराची अक्षरश: राखरांगोळी झाली. कुटुंबाचे ५० हजारांचे नुकसान झाले. काय घडले वाचा..

घराला आग; ५० हजारांचे नुकसान 

कुंभारवाडा परिसरातील शितळादेवी मंदिर परिसरातील सुरेश चव्हाण यांच्या घरातील फ्रीजने गुरुवारी (ता. २२) दुपारी अडीचच्या सुमारास अचानक पेट घेतला. बघता बघता आग वाढत गेल्याने चव्हाण कुटुंबीयांनी घराच्या बाहेर पळ काढला. सारडा सर्कल अग्निशमन विभाग मुख्यालयातील बंब व पंचवटी अग्निशमन विभागाचा बंबही पाचारण करण्यात आला.

तर अनर्थ घडला असता. 

फायरमन इक्बाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालक एम. डी. कदम, व्ही. पी. शिंदे, टी. एन. भास्कर, ए. एस. गांगुर्डे, तौसिफ शेख, डी. पी. दराडे यांनी दारातून पाण्याचा मारा केला. तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीत फ्रीज, टीव्ही, अन्य साहित्य, संसारोपयोगी साहित्य असे सुमारे ४० ते ५० हजारांचे नुकसान झाले. आगीवर पाण्याचा मारा करत असताना अचानक विद्युतप्रवाह असलेली तार खाली पडली. सुदैवाने कर्मचारी मागे सरकल्याने तार जमिनीवर पडली. कर्मचारी मागे सरकले नसते तर अनर्थ घडला असता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT