Housewife boiling curry to prepare pickle.  esakal
नाशिक

Nashik News : चटकदार लोणच्याला महागाईची फोडणी...! ग्रामीण भागात लोणचं तयार करण्याची लगबग

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ग्रामीण भागातील गृहिणींची घरगुती चटकदार लोणचे बनविण्यासाठी लगबग जोरात सुरू झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत कैरीचे व त्यासाठी लागणाऱ्या मसाल्याचे भाव वाढल्याने चटकदार लोणच्याला महागाईचा झळ बसल्याने घरचे गावरान लोणचं यंदा काहीसे तिखट होणार आहे. (Housewives in rural areas have started to make homemade spicy pickles nashik news)

मराठमोळ्या जेवणाच्या ताटात आंबट, गोड, तिखट तसेच चटकदार कैरीचे लोणचे असल्याशिवाय जेवणाला रंगत येत नाही. यावर्षी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारा, गारपीट यामुळे आंब्याचा मोहोर उशिरा तसेच कमी प्रमाणात लागला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसामुळे लगडलेल्या गावरान कैरीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे कैरी भाव खात आहे. मसाल्याच्या किमतींत मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरगुती गावरान लोणचं बनवायला येणारा खर्चात यावर्षी वाढ झाली आहे.

बाजारात विविध प्रकारचे लोणचे मिळत असले तरी घरगुती गावरान आंब्यापासून तयार केलेल्या लोणच्याची चवच न्यारी असल्याने गृहिणींचा घरीच लोणचं तयार करण्याकडे कल असतो. जेवणात लज्जत वाढवणारा पदार्थ लोणचं यावर्षी गावरान आंब्यावरील कमी प्रमाणात उरलेल्या कैऱ्यामुळे अनेक गृहिणीकडून आता कलमी कैरीकडे ओढ निर्माण झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

खर्चात वाढ

गावराण कैरीचे लोणचे बनविण्यासाठी लागणाऱ्या कैरी, तेल आणि मसाल्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरगुती लोणचं बनवायला येणाऱ्या खर्चात दुप्पटीने वाढ झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे गावराण कैरीचे उत्पादन घटल्याने यंदाच्या वर्षी कैरीच्या किमतीत वाढ झाली आहे.

"आमच्या शेतात तीसहून अधिक कलमी तसेच गावरान आंबे लागवड केली आहेत. मात्र वातावरणात बदल व अवकाळी पाऊस, वादळात आंब्यावरील मोहर गळून पडल्याने लोणच्याची कैरी बाजारातून विकत घ्यावी लागली आहे. त्यात भाववाढीमुळे खर्चात वाढ झाली आहे." - तेजस्विनी देवरे, गृहिणी करंजाड.

"दरवर्षी लोणच्यासाठी गावरान कैरीचा वापर करीत असते. मात्र या वर्षात गावरान कैरी कमी प्रमाणात दिसून येत असल्याने कलमी आंब्यापासून लोणच तयार करावे लागत आहे." - प्रतिभा देसले, गृहिणी, गोराणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT