vat paurnima.png 
नाशिक

वटपौर्णिमेसाठी 'असा' आहे मुहूर्त.. कोरोनाचे ठेवा भान..घ्या अशी काळजी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने यमदेवांकडून आपला पती सत्यवानाचा प्राण परत आणले. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेव्हापासून आपल्या पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे तसेच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून सुवासिनींकडून या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते, अशी आख्यायिका आहे. सुवासिनी या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत पूजासाहित्य खरेदी करण्यासाठी सुवासिनींची लगबग सुरू होती. 

योग्य ती काळजी घेणे आवश्यक

यंदा कोरोनाच्या संकटामुळे सर्व सण आणि उत्सव घरीच साजरे करण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. मात्र आता हळूहळू लॉकडाऊन कमी केले जात आहे. यामुळे जर का तुम्ही राहात असणारा भाग कंटेनमेंट झोन नसेल आणि तुम्हाला अगदी सहज बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य असेल तरच बाहेर पडावे. मात्र पूजेला जाताना सुद्धा योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

अशी घ्या काळजी

-वटपौर्णिमा पूजा करायला बाहेर पडत असाल तर अशी घ्या काळजी
झाडाभोवती गर्दी करु नये. निदान दोन फुट अंतर ठेवा.

- शक्य असल्यास सकाळी लवकर जाऊन पूजा करून घ्यावी जेणेकरून गर्दीच्या वेळी आधीच तुम्ही घरी आलेल्या असाल.

- मास्क लावून पूजा करावी.

- वाण देताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करायला विसरू नका.

- फोटो काढत बसू नका.

बाहेर जाण्यापेक्षा असे का नाही करत?

दरम्यान, जर का तुम्हाला इतक्या सहजपणे बाहेर जाणे शक्य होणार नसेल तर यंदा विधीवत उपवास करुन सुद्धा तुम्ही सण साजरा करू शकता. झाडाच्या फांद्या तोडून घरात सण करणे मात्र नक्की टाळा. गोडाधोडाचे जेवण करून, पतीसोबत वेळ घालवून जर तुम्ही सण साजरा केला तर यामार्गी तुमच्यातील जवळीक आणखीन वाढू शकते. आणि हाच या सणाचा मुख्य हेतू आहे नाही का?

असा आहे मुहूर्त
दरम्यान, उद्या (ता. 5) पूजेसाठी दिवसभर मुहुर्त आहे. चंद्रग्रहण असले तरी पूजा करता येणार आहे. चंद्रग्रहण रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी सुरू होणार असून उत्तर रात्री दोन वाजून 34 मिनिटांपर्यंत ग्रहणकाळ आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

Latest Marathi News Live Update : लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या कॅप्टन खरातच्या ऑफिस बॉयवरही गुन्हा दाखल

CIDCO: आनंदाची बातमी! सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली; आता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार, व्याजदर अन् नवीन लिमिट किती?

Gudi Padwa 2026: भोपाळमध्ये 'मराठी' थाट! मुख्यमंत्र्यांनी घातली पेशवाई पगडी; ढोल-ताशांच्या गजरात गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

Prajwal Revanna Case : 13 हजार पानांचं आरोपपत्र, 70 पेनड्राइव्ह, 39 आरोपी अन् अंगावर काटा आणणारे पुरावे; माजी खासदाराच्या 'त्या' अश्लील व्हिडिओंचं सत्य समोर!

SCROLL FOR NEXT