Stress In Child esakal
नाशिक

Stress Management : तणावात नव्‍हे आत्‍मविश्‍वासाने करा परीक्षांची तयारी! तज्‍ज्ञांकडून विद्यार्थी पालकांना सल्‍ला

सकाळ वृत्तसेवा

Stress Management : कोटा (राजस्‍थान) येथे ऑगस्‍टमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्‍महत्‍या केल्‍याच्‍या घटनेने कटू स्‍पर्धेचे धगधगते वास्‍तव समोर आले. परीक्षेला तणावात नव्‍हे, आत्‍मविश्‍वासाने परीक्षांची तयारी करण्याचा सल्‍ला जाणकारांनी दिला आहे. कोटा येथे घडलेली घटना ही विद्यार्थी-पालकांसाठी सावधगिरीचा इशारा असल्‍याचे तज्‍ज्ञांचे म्‍हणणे आहे.

चांगले करिअर घडविणे व त्‍यासाठी विविध स्‍पर्धांना सामोरे जाताना हजारो विद्यार्थी खेळण्या बागडण्याच्‍या वयात अत्‍यंत तणावपूर्ण जीवन जगता आहेत.

नामांकित राष्ट्रीय शैक्षणिक संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांच्‍या तयारीसाठी काही विद्यार्थी थेट कोटा (राजस्‍थान) व यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत. (how to manage Stress nashik news)

मुळातच घरापासून दूर राहताना भावनिक आधारापासून वंचित हे विद्यार्थी दडपणाखाली येऊ लागले आहेत. कोटा येथे ऑगस्‍टमध्ये आत्‍महत्‍येच्‍या समोर आलेल्‍या प्रकारांतून अधोरेखित होत आहे.

घरात राहाणारे किंवा घरापासून दूर राहून प्रवेश परीक्षांची तयारी करणारे अशा कुठल्‍याच स्वरूपाच्या विद्यार्थ्याने तणाव घेऊन परीक्षेला सामोरे जाऊ नये. तर आत्‍मविश्‍वासाने व सकारात्‍मक दृष्टिकोनातून परीक्षांचा सामना करताना परीक्षेत यशस्‍वी कामगिरी करण्याचा सल्‍ला जाणकारांकडून दिला जातो आहे.

सराव परीक्षा सुधारणेसाठी...

वाढत्‍या दडपणात दिलेल्‍या सराव परीक्षेतील सुमार कामगिरीमुळे विद्यार्थ्यांनी आत्‍महत्‍या केल्‍याचे निदर्शनात येते आहे. आपला अभ्यास कुठे कमी पडला आहे, याचा अंदाज यावा, यासाठी या सराव परीक्षा आहेत. त्‍यातील चुकांतून सुधारणा अपेक्षित असून, याअनुषंगाने विद्यार्थ्यांचे समुपदेशनदेखील महत्त्वाचे झाले आहे.

ही काळजी घ्या..

* आपल्‍या पाल्‍यासोबत नियमित संवाद ठेवा.

* अभ्यासाचा ताण जाणवणार नाही, असे वातावरण उपलब्‍ध करा.

* चांगल्‍या कामगिरीसाठी पाल्‍यावर दडपण आणू नका.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

* पाल्‍याच्‍या मित्र परिवारासोबतही संवाद साधत त्‍यांचाही आत्‍मविश्‍वास वाढवा.

* पाल्‍य तणावात असल्‍याचे जाणवल्‍यास योग्‍य वेळी मानसोपचार तज्‍ज्ञ, समुपदेशकांचा सल्‍ला घ्या.

* पाल्‍याच्‍या शिक्षकांसोबत संपर्कामध्ये राहा.

* परीक्षा कालावधीत हलके फुलके वातावरण राहील याची काळजी घ्या.

* इतर शहर, राज्‍यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी ब्रेक देत कुटुंबासोबत वेळ घालवू द्यावा.

"चाचणी परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर अंतिम परीक्षेचा निकालाचा निष्कर्ष लावायला नको. सराव परीक्षेतील कामगिरीतून पुढील परीक्षेत सुधारणांसाठी प्रयत्‍न करावे. मुळातच परीक्षेच्‍या तयारीचा निर्णय विद्यार्थ्यांनी स्‍वतः घेतलेला असावा. तयारीदरम्‍यान अडचणींबाबत पालकांशी मनमोकळे बोलावे. पालकांनीही पाल्‍यावर दडपण आणू नये. आत्‍महत्‍या कुठल्‍याच समस्‍येसाठी पर्याय असू शकत नाही." -डॉ. शैलेंद्र गायकवाड, संमोहन तज्‍ज्ञ.

"महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी कोट्याला शिक्षणासाठी जातात. यशस्‍वी होण्याच्‍या चढाओढीत घरापासून लांब राहातांना त्‍यांच्‍या आरोग्‍यावर गंभीर परिणाम होतात. बारावीपर्यंतच्‍या शिक्षणासाठी विद्यार्थी कुटुंबासोबतच असावेत. कौटुंबिक वातावरणात विद्यार्थ्यांवर तणाव येत नाही, त्‍यांना भावनिक आधार मिळतो. नाशिकमध्ये राहूनही राष्ट्रीय क्रमवारीत यशस्‍वी होता येते, हे माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी कामगिरीतून सिद्ध करून दाखविले आहे." - प्रमोद पाटील, संचालक, स्‍मार्ट एज्‍युकेशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT