Humanity esakal
नाशिक

Nashik : 'अनाथाचे नाथ' बनले कळमदरी गाव!

घनश्याम अहिरे : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : घटना आहे कळमदरी (ता. नांदगाव) येथील दारिद्र्यात जगणाऱ्या धोत्रे परिवाराची. गावात धोत्रेंची घरे अवघी तीन अन्‌ रोजंदारीचे मातीकाम (Pottery) हेच जगण्याचे एकमेव साधन. तीनपैकी एका परिवारावर संकट कोसळले. जन्मापासून परोपकाराचे ओझे मिरवणारा युवक अपघातात जबर जखमी (serious Injured) झाला. ‘अनाथ’ बालमित्राला वाचविण्यासाठी अवघा गाव ‘नाथ’ बनला. तन-मन-धनाने कळमदरीवासीयांनी ‘गरिबाचे लेकरू जगायला हवे’ असे व्यक्त होत माणुसकीचे (Humanity) अनोखे दर्शन घडविले. (Humanity of kalamdari village Nashik News)

नाव विलास, पण घरात अठराविश्व दारिद्र्य. जन्माला येताच आई देवाघरी गेली. भावकीच्या मातांच्या दुधावर वाढलेले हे पोर. परमाया जणू त्याच्या पाचवीला पुजलेली. वडिलांचे छत्र वयाच्या पाचव्या वर्षी हरपले. वयोवृद्ध आजी-आजोबांनी वंशाचा दिवा दारिद्र्यात जपला. वृद्ध जोडप्याने काबाडकष्ट करून नातवाला आठवीपर्यंत शिकविले. विलासचे लग्न लक्ष्मीबरोबर झाले. तीन मुली परिवारात आल्या. आजी-बाबा देवाघरी गेले. विलास अन्‌ लक्ष्मी हातमजुरी करून गरिबीचे ठिगळ जोडताना कष्टाला सीमा नाही. या जोडप्याचा प्रामाणिकपणा अवघ्या गावाला ज्ञात. मित्र गोतावळ्यात विलास धोत्रे सर्वांसाठी सुदामाच! नवे कपडे घेण्यासाठी कळमदरीहून नातलगांच्या दुचाकीने नांदगावला जात असताना, अपघात झाला. चालक समाधान गायकवाड गतप्राण झाला, तर विलास जबर जखमी झाला. या वार्तेने अवघा गाव हबकला. मात्र, द्रुतगतीने मदतीला सरसावलाही.

कळमदरी (ता. नांदगाव) येथील युवकांनी गावातील विविध प्रश्नांवर प्रबोधन घडविणे व उपेक्षितांना मदतीच्या हेतूने दीडशेच्यावर सुशिक्षित बेरोजगार, व्यावसायिक व नोकरदारांनी एकत्रित येऊन युवा एकता ग्रुप स्थापन केला आहे. मृत्यूशी झुंज देत असलेल्या आपल्या गरीब अन्‌ मनमिळाऊ मित्राला जगावायचंच, असा चंग गावाने बांधला. पोटाला व डोक्याला जबर मार लागलेल्या जखमी विलासवर पाच दिवस मालेगावला प्रयास रुग्णालयात, तर सध्या धुळे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आर्थिक मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्यांना सोशल मीडियावर आवाहन करण्यात येत आहे.

कळमदरी गावातील प्रत्येक घरातून मदत मिळवली. ग्रामपंचायत व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीला पुढाकार घेतला. अवघ्या काही तासांत पन्नास हजारांची मदत उभी राहिल्याने तरुणाईत उत्साह संचारला आहे. या मदतीने धोत्रे परिवार आश्वस्त झाला आहे. माणुसकीची ही अनोखी भिंत तरुणाईच्या सकारात्मक कृतिशील उपक्रमाची साक्ष बनली आहे. दातृत्वाचे हे अनोखे उदाहरण मालेगाव, नांदगाव परिघात चर्चेचा विषय बनले आहे.

"विलास धोत्रे अतिशय मितभाषी आणि प्रामाणिक मुलगा आहे. त्याच्यावर कोसळलेली संकटे गावाला माहीत आहेत. संपूर्ण गाव मदतीसाठी धावून आला आहे. लढाई अजून संपलेली नाही. विलासला जगवायचे आहे." - सुनील पगार, सामाजिक कार्यकर्ता, कळमदरी (ता. नांदगाव)

"गावाने केलेली मदत जन्मभर विसरता येणार नाही. माझे कुंकू वाचविण्यासाठी सगळा गाव मदतीला उभा राहिला." - लक्ष्मी धोत्रे, जखमी विलासची पत्नी, कळमदरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT