Humor Therapy
Humor Therapy esakal
नाशिक

Humor Therapy : तणाव घालविण्यासाठी मनापासून हसा!; हास्‍य योगाच्या सरावातून होतो फायदा!

सकाळ वृत्तसेवा

पल्‍लवी कुलकर्णी-शुक्‍ल : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भाव, भावना, चिंता, ताण हे मानवासाठी स्वाभाविक आहेत. धावत्या जीवनशैलीमध्ये महिला अन् पुरुषांना ताणतणावातून मार्गक्रमण करावे लागते. त्यावर हास्योपचार या नैसर्गिक देणगीचा उपयोग करायला हवा. नेमके हेच हेरून नाशिकच्या विविध भागामध्ये महिलांसाठीचे हास्य क्लब वाढत चालले आहेत. हास्ययोगाच्या सरावातून फायदा होत असल्याचे महिला अनुभवाताहेत. (Humor Therapy Laugh heartily to relieve stress Laughter Yoga practice benefits Nashik news)

हास्य आवाज प्रकारामध्ये मोठा श्‍वास घेत हवा मुखावाटे आत घेतली जाते. छाती आणि पोट हवेने भरल्यावर स्नायूंच्या आकुंचन व प्रसारणाने तोंडावाटे ‘हा हा, हो–हो, हॉ–हॉ' असा नाभीच्या मुळापर्यंतचा आवाज करत बाहेर फेकल्‍याने हास्‍याची क्रिया घडते. अर्थात, हास्‍याचा आकारबंध प्रत्येक व्यक्तीत विशिष्ट व वेगवेगळा असतो. सतत हसतमुख चेहरा असला म्‍हणजे आजूबाजूच्या व्यक्‍तींच्या चेहऱ्यावर स्मितहास्‍य उमटते.

औपचारिक प्रकारात येणारे मंदहास्य. आपण पहिल्यांदा भेटल्यावर मंद हास्य केल्यावर गाल, ओठ या अवयवांच्या स्‍नायूंचा योग्‍य व्यायाम होतो. मोठ्याने हसण्याने घसा आणि पडजिभेच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. पूर्णशक्तीनिशी हसल्याने शरीराचे सर्व अवयव सक्रिय होण्यास मदत होते. मेंदूतील ताण विसरून विराट हास्यातून ‘फ्रेश’ वाटते. नाभीच्या मुळापासून झेपेल तसे हळूवार करत चढत्‍या क्रमाने मोठा आवाज करत हसणे, यास गडगडाटी हास्‍य म्‍हणतात. पोटाच्या स्‍नायूंना व्यायाम मिळाल्‍याने स्‍नायूंचे कार्य वेगवान होते.

पोट कमी होण्यासाठी या हास्‍याचा विशेषतः उपयोग होतो. खाली वाकून दोन्ही हात पसरून ‘हा-हा’ आवाज करत मोठ्याने हास्य करणे याला रावणहास्य म्हणतात. त्यात स्नायूच्या आकुंचन-प्रसरणाचा व्यायाम होतो. आकडी हास्यामध्ये एक बोटाची टाळी, मग दोन बोटाची, तीन बोटाची अशाप्रकारे पाच बोटाची टाळी देत हास्‍य वाढत जाते. त्यामुळे श्‍वसनाची क्रिया लांबते. हृदय व फुफ्फुसाच्या स्‍नायूंना व्यायाम मिळतो. ही सारी माहिती हास्य क्लबमध्ये दिली जाते.

हासण्याचे काही फायदे

- निखळ हास्यातून चेहरा प्रसन्न दिसतो

- विचारामध्ये विधायकता येते आणि मन प्रसन्न होते

- पचनक्रिया सुधारते, श्‍वासाची गती नियंत्रित होऊन उच्च व कमी रक्तदाबाच्या आजारात फायदा होतो

- क्रोध दूर होतो. करुणा, क्षमा भाव वृद्धिंगत होतो

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

सगळ्यांना वंदनीय

वदनं प्रसादसदनं सदयं हृदयं सुधामुचो वाचः।

करणं परोपकरणं येषां केषां न ते वन्द्याः।।

अर्थात, सदैव हसमुख, प्रसन्न वदन, हृदयात दयाळू भाव, अमृतसमान वाणी, परोपकारी व्यक्‍ती हा सगळ्यांना वंदनीय असतो.

"हास्‍ययोगाच्या व्यायामाने पूर्ण शरीर शुद्धीकरण होते. चेहरा व पोटाचे स्‍नायू या प्रमुख भागांना व्यायाम होतो. सकाळी एक तासाच्या व्यायामाने पूर्ण दिवसाची ऊर्जा शरीरास मिळते. दिवसभर प्रसन्न व ‘फ्रेश’ वाटते. आम्ही उत्‍साहाने एकत्रितपणे दैनंदिन हास्‍ययोग व्यायाम करतो. चला, तर मग हसणे आणि हसवण्याला आपल्‍या जीवनाचा भाग बनवू यात."

- स्‍मिता आपटे (हास्‍ययोग क्रिया, इंदिरानगर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT