Hundreds of Israeli mango trees cut down  esakal
नाशिक

कुरापतखोरांकडून शेकडो इस्रायली आंब्याच्या झाडांची कत्तल

राहूल बोरसे

हरसूल (जि. नाशिक) : निरगुडे (ता. त्र्यंबकेश्वर) येथील सरपंच प्रवीण तुंगार यांच्या गट क्रमांक १६ च्या शिवारामधील आंबा बागेतील ३ ते ४ वर्षाच्या सुमारे साडेतिनशेवर आंब्याच्या झाडांची अज्ञातांनी रात्रीतून कत्तल केली आहे. कुरापतीतून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याचा प्रवीण तुंगार यांचा दावा आहे.

सरपंच तुंगार यांनी अतिशय मेहनतीने गेल्या तीन वर्षांपासून इस्रायल पद्धतीने आंबा बागेची लागवड केली होती. व्यवस्थित निगा राखल्यामुळे बागही चांगली बहरली होती. अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास बागेत कुणीही नसल्याचा फायदा घेत शेकडो झाडांची बुंध्यातून कत्तल करून बागच भुईसपाट केली आहे. त्यामळे सरपंच प्रवीण तुंगार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तोडणीला आलेल्या बागेला आमदार हिरामण खोसकर यांनी भेट देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महसूल विभागानेही पंचनामा केला आहे.

''आंब्याची बाग जिवापाड जपली होती. कुणीतरी सूडभावनेने हे कृत्य केले असावे. संबंधितांनी त्याचा शोध होऊन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. माझे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने भरपाई मिळवून द्यावी.'' - प्रवीण तुंगार, सरपंच निरगुडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT