majur.jpg 
नाशिक

भरउन्हात रस्ता कापत सुरु 'त्यांचा' प्रवास...जीवाचा आटापीटा करत घराकडे जायची धडपड!...पण

सकाळवृत्तसेवा

नाशिक : "लॉकडाउन'मुळे मुरबाडमध्ये (जि. ठाणे) अडकून असलेले मध्य प्रदेशातील शेकडो परप्रांतीय मजूर मुंबई- आग्रा महामार्गाने गुरुवारी (ता.23) मध्य प्रदेशच्या दिशेने निघाले होते. हे मजूर नाशिकमधील उड्डाणपुलावरून जात असताना मुंबई-नाका पोलिसांनी त्यांना अडवत 106 परप्रांतीयांची रवानगी आनंदवलीतील निवारा शेडमध्ये केली. 

पादचाऱ्यांची पोलिसांकडे विनवणी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सहा आठवड्यांपासून राज्यात "लॉकडाउन' सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर अडकून पडले आहेत. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये अडकून असलेल्या शेकडो मजुरांनी कुटुंबीयांसह मुंबई- आग्रा महामार्गाने मध्य प्रदेशच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला. गुरुवारी दुपारी साडेचार-पाचच्या सुमारास मुरबाडहून निघालेले हे शेकडो परप्रांतीय नाशिक शहरातील महामार्गाच्या उड्डाणपुलावरून जात होते. मुंबई नाका पोलिसांना मोठ्या संख्येने परप्रांतीय महामार्गाने जात असल्याचे कळताच त्यांना उड्डाणपुलावर रोखले. ते मुरबाडहून मध्य प्रदेशकडे जात असल्याचे सांगितले. तसेच, जाण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे विनंतीही केली. उपायुक्त अमोल तांबे यांनीही घटनास्थळी भेट दिली. 

ट्रकचालकांकडून वाहतूक
 
मुंबईकडून परराज्यात निघालेल्या परप्रांतीयांना ट्रकचालक थेट पोचविण्याचे आश्‍वासन देतात. मात्र नाशिकच्या चेकपोस्टच्या अलीकडेच त्यांना उतरवून शहर ओलांडून येण्याचे सांगतात. त्यानुसार हे परप्रांतीय शहरातून जात होते. त्यामुळे अजूनही ट्रकचालकांकडून अडकून असलेल्या परप्रांतीयांची अनधिकृतरीत्या प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. 

मुरबाड परिसरातून हे परप्रांतीय मध्य प्रदेशच्या दिशेने पायी निघाले होते. ही बाब लक्षात येताच त्यांना ताब्यात घेत त्यांची रवानगी आनंदवलीच्या निवारागृहात करण्यात आली आहे. - अमोल तांबे, पोलिस उपायुक्त, नाशिक 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT