नाशिक / सटाणा/जायखेडा : सोमवारी सायंकाळी पाचला तालुक्यात ढग दाटून आले. काही वेळातच विजांच्या कडकडाटासह वादळी पावसास सुरवात झाली. तालुक्यातील जयपूर येथील रणजित सूर्यवंशी यांच्या गट क्रमांक 162 मधील कांदाचाळीवर वीज कोसळली आणि मग होत्याचे नव्हते झाले.
अशी घडली घटना
सोमवारी सायंकाळी पाचला तालुक्यात ढग दाटून आले. काही वेळातच विजांच्या कडकडाटासह वादळी पावसास सुरवात झाली. तालुक्यातील जयपूर येथील रणजित सूर्यवंशी यांच्या गट क्रमांक 162 मधील कांदाचाळीवर वीज कोसळली आणि चाळीतील कांद्यासह शेतीपयोगी वस्तूंनी क्षणात पेट घेतला. घटनास्थळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. बादली व हंड्यांनी पाणी आणून ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने आग काही प्रमाणात आटोक्यात आली. सूर्यवंशी यांच्या कांदाचाळीला लागूनच दुसऱ्या शेतकऱ्यांच्याही कांदाचाळी आहेत. आग पसरली असती, तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मात्र, परिसरातील शेतकऱ्यांच्या समयसूचकतेमुळे रात्री उशिरा आग आटोक्यात आली. सध्या कोरोनाच्या महामारीने पिकांना आधीच फटका बसला असताना, आता अस्मानी संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क
वीज पडून चाळीतील शेकडो क्विंटल कांदा खाक
जयपूर (ता. बागलाण) येथे सोमवारी (ता. 1) सायंकाळी शेतकरी रणजित प्रताप सूर्यवंशी यांच्या शेतातील कांदाचाळीवर वीज पडली. त्यामुळे चाळीला आग लागली. आगीत शेकडो क्विंटल कांद्यासह शेतीपयोगी सर्व साहित्य व चाळ खाक झाली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.